रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने चाकरमान्यांना राहवे लागते भिजत उभे.
*🛑 रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने चाकरमान्यांना राहवे लागते भिजत उभे.*
*🛑 बाहेर हाय फाय आतून काय नाय अशी रेल्वे स्थानकांची अवस्था.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात पाऊसात भिजत उभे राहत ट्रेनची प्रतिक्षा करावी लागत आहे, गणेशोत्सवात काळात कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, यंदा मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले आहेत, दिड, पाच, सात, नऊ दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करून चाकरमानी आता परत आपल्या नोकरीच्या ठिकाणी जायला निघाले आहेत…
यंदा गणेशोत्सवात पाऊसाची रिपरीप सुरू असलेल्याने चाकरमान्यांना अडचणींचा सामना करत परतीचा प्रवास करावा लागत आहे,
सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने भरपावसात चाकरमान्यांना भिजत उभे राहावे लागत आहे, असे चित्र सर्व रेल्वे स्थानकांवर दिसत आहे…
कोकणात पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गांचे देखभाल दुरुस्ती आणि परिसरातील सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण 37 रेल्वेस्थानके आहेत. त्यापैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम पहिल्या टप्प्यात होत आहे.
रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, रस्त्याच्याकडेला प्रकाश दिवे लावणे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात स्टेशन प्लाझा, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात बस थांबे बांधणे, स्टेशन प्लाझा अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतिक्षालयाची व्यवस्था करणे. ऊन पाऊसापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी व्यवस्था, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याकरीता प्रशस्त मार्ग, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानके वीर, माणगाव आणि कोलाड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी. या कामांना राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मार्च 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात आली आहेत आणि काही रेल्वे स्थानकांचे बाहेरुन सुशोभीकरण पुर्ण होऊन मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन पुर्ण झाले आहेत…
माञ रेल्वे स्थानकांच्या आतील परीस्थिती वेगळी आहे, आतमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर पञ्याची शेड नसल्याने रेल्वे प्रवाशांना ऊन, पाऊस याचा सामना सहन करावा लागत आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे,
याबाबत रेल्वे प्रवासी संघटना वेळोवेळी आवाज उठवत आहे,
रेल्वे स्टेशनचे खालच्या बाजुने सुशोभिकरण करताना रेल्वेकडून करार करुन जागा घेतली. तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्म , निवारा शेड करण्याकरीता जागा मिळू शकते. त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता, नागरिक, चाकरमानी यांना होईल.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_