अपहार प्रकरणात दोघांचा अटकपूर्व जामीन नामंजूर
*🛑अपहार प्रकरणात दोघांचा अटकपूर्व जामीन नामंजूर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१४:-* तळवडे ग्रामपंचायतीत ७३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे आणि ठेकेदार सीताराम जुवेकर या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
सन २०२१-२२ व २०२२- २३ या दोन वर्षाच्या काळात साहित्य खरेदीसाठी ७२ लाख ८१ हजार ७० रुपये एवढी रक्कम कुठलेही साहित्य खरेदी न करता ठेकेदारांकडून बनावट व खोटी बिले करून दप्तरी नोंद केली. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सरपंच विनिता मेस्त्री, ठेकेदार धोंडू बांदिवडेकर, ठेकेदार प्रथमेश धुरी, ठेकेदार सीताराम जुवेकर
यांच्या संमतीने १४ व १५ व्या
वित्त आयोगातील रक्कम हडप
करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या पाचही संशयित आरोपींविरोधात विस्तार अधिकारी गजानन धर्णे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे आणि ठेकेदार सीताराम जुवेकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावरील सुनावणीत तो नामंजूर करण्यात आला. संशयितांच्या अकौंटवर यातील काही रक्कम जमा दिसून येत असून त्याचा विनियोग कसा केला? तसेच अन्य मुद्यांबाबत तपासासाठी आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून देत अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा आग्रह सरकार पक्षाने केला होता. तो ग्राह्य मानून न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केल्याचे अॅड. गजानन तोडकरी यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
