रीक्षाला धडक बस चालकावर गुन्हा दाखल
रीक्षाला धडक बस चालकावर गुन्हा दाखल
खेड (प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील वावेतर्फे नातूनगर येथे रिक्षाला धडक देत पाच जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रवीणकुमार राजाराम कुंभार (४१, रा. गडहिंग्लज) या बसचालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरसिंग श्रीधर दळवी हे आपल्या ताब्यातील (एमएच ४८/एएक्स १५६१) रिक्षात प्रवाशांना बसवून वावेतर्फे नातूनगर येथे उभे होते. याचवेळी (एम.एच.१४/ बी. टी. २६०२) बसमधून प्रवाशांना घेवून येनारी प्रवीणकुमार कुंभार ताब्यातील बसची धडक रिक्षाला बसली. या अपघातात पांडुरंग मोरे, दीक्षा दीपक संजना सतिश बुरटे, सोनल शिंदे, अश्विनी अनंत भुवड रा. नातूनगर) हे जखमी झाले जखमींना उपचारासाठी क उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच जण जखमींसह रिक्षाच्या नुकसान कारणीभूत ठरल्याचा ठपका बसचालकावर ठेवण्यात आला या प्रकरणी अधिक
तपास पोलिस करत आहेत.