न्यू गरड येथील मज्जीद परिसरात आढळला नऊ फुट लांबीचा अजगर
न्यू गरड येथील मज्जीद परिसरात आढळला नऊ फुट लांबीचा अजगर
सर्पमित्र नबीद हेरेकर यांनी त्याला पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात
सावंतवाडी-
काल दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास माजगाव न्यू गरड येथील इरफान शेख यांना गरड मस्जिद परिसरात एक अजगर आढळून आला त्यांनी तांबोडतोब सावंतवाडी येथील सर्पमित्र श्री. नवीद हेरेकर यांना संपर्क साधला हेरेकर यांनी तेथे पोहचत त्या अजगराला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा कु. कबीर देखील होता. कबीर हा केवळ 8 वर्षांचा असून आपल्या वडिलांना या प्राणी रक्षणासाठी सहकार्य करत असतो.

