सावंतवाडी शहराचे नाक असलेल्या मोती तलावाला शुभेच्छा बॅनरचे ग्रहण..
*🛑 सावंतवाडी शहराचे नाक असलेल्या मोती तलावाला शुभेच्छा बॅनरचे ग्रहण..*
*🛑 अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या शुभेच्छा बॅनर वर मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठी विविध राजकीय पक्षांचे गणपती सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे बॅनर लागल्याने व हे बॅनर वाहनधारकांना अडथळा ठरत असल्याने अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे,नगरपालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे फलक लावण्यात आल्याने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी अनधिकृत लावलेल्या बॅनरवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत आहे.सावंतवाडी शहराचे मोती तलाव हे नाक आहे, मोती तलावामुळे सावंतवाडीच्या सौंदर्यात भर पडते, अशा सुंदर शहराला विद्रूपीकरण प्राप्त होऊ नये म्हणून सावंतवाडी नगरपालिकेने नगरसेवकांच्या मासिक सभेत तसा ठराव करून शुभेच्छा फलकांच्या जागा ठरवून दिल्या व त्याचे दरही ठरविण्यात आलेत, मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसून गणपतीला शुभेच्छा देणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी संपूर्ण सावंतवाडी तलावाला शुभेच्छा बॅनर ने झाकून टाकले आहे, एवढेच नव्हे तर विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत पोलवरील शुभेच्छा बॅनर चढाओढीत लावल्याने हे बॅनर वाहनधारकांना त्रासदायक ठरला ठरत आहेत. वळणावरील समोरचा रस्ता या फलकांमुळे दिसत नसल्याने अपघात घडवून जीवित हानी होण्याचे शक्यता निर्माण झाली आहे,सावंतवाडी नगरपालिकेवर सध्या प्रशासकाचे राज्य असल्याने हा कारभार चालला की काय अशी विचारणा होत आहे, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे. जनतेमध्ये खरोखरच काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारचे शुभेच्छा बॅनर लावण्याची गरज नाही, कारण तो लोकप्रतिनिधी जनतेच्या मनामध्ये असतो तसेच चांगले कार्य त्याच्या हातून घडले पाहिजे जर असे कार्य त्याच्या हातून घडले असेल तर अशा प्रकारचे शुभेच्छा बॅनर लावून शो बाजी करण्याची आवश्यकता नाही असे वाहनधारक सागर सामंत यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना स्पष्ट केले.मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण चतुर्थी सणांमध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे शुभेच्छा बॅनर रस्त्यावर असल्याने अपघातास कारणीभूत ठरणार आहेत एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सागर सामंत यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना उपस्थित केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

