प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्या आत्महत्येस जबाबदार संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..

▪️सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१४: पुनर्वसन गावठाणात भूखंडाचा ताबा पावती देण्यात वर्षभराचा कालावधी लागला, प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडाचा ताबा पावती साठी खेपा मारल्या परंतु प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. धरणाच्या पाण्यात बुडालेले घर, जमीन, जागेचे, योग्य प्रकारे न केलेले मूल्यांकन या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केलेले शांताराम नागप यांच्या आत्महत्येस जबाबदार धरून प्रकल्प अधिकारी राजन डवरी संबंधित अधिकारी व तथाकथित धरण समितीच्या पुढार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावा. अशी मागणी मनोज पाटील सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एका निवेदनाद्वारे १४ जानेवारी २०१९ रोजी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, सेक्रेटरी अजय नागप, उपाध्यक्ष मनोहर तळेकर, सूर्यकांत नागप अशोक नागप, सखाराम मोरे सुचित के. चव्हाण, आरती कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

६ जानेवारी २०२१ रोजी प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यांना वैभववाडी रुग्णालयात दाखल केले असता आत्महत्या करण्याचे कारण त्यांनी आपल्या जबाबात वैभववाडी पोलिसांना दिले आहेत.

यानंतर वैभववाडी पोलिसांना कार्यकारी अभियंता राजन डोरी तात्काळ भेटून गेले.हे प्रकरण आठ दिवसानंतर समाज माध्यमांसमोर आले होते. धक्कादायक असलेल्या या प्रकरणातील पीडित शांताराम नागप यांना सिंधुदुर्ग, कोल्हापूर, येथील उपचारानंतर केईएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. १३ जानेवारी २०२१ रोजी मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

शांताराम नागप यांच्या निवासी भूखंडाचा ताबा पावती न मिळाल्याने त्यांच्या घरात वीज वितरण कंपनी लाईट देत नव्हती संबंधित अधिकारी कोणच्या सांगण्यावरून प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांना ताबा पावती देत नव्हते.वर्षभराचा कालावधी लोटला तरी त्यांना ताबा पावती न देण्याचे कारण काय? अरुणा प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समितीचे नेतृत्व स्वीकारले होते. परंतु त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात करून सौदेबाजी केली. व घळभरणी करण्यास परवानगी दिली होती. घळभरणी करण्यास परवानगी दिली नसती तर मयत प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्यासह सुमारे १३० प्रकल्पग्रस्तांची राहती घरे प्रकल्पाच्या पाण्यात बुडाली नसती.व शांताराम नागप यांच्यावर आत्महत्या करून जीवन संपण्याची वेळ आली नसती. असा आरोप अध्यक्ष तानाजी कांबळे, सेक्रेटरी मनोहर तळेकर, सूर्यकांत नागप, सखाराम मोरे, सुचिता चव्हाण,आरती कांबळे यांनी केला आहे .
वैभववाडी पोलिसांनी मयत शांताराम नागप यांचे जबाब घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता राजन डवरी, यांचे काय बोलणे झाले? राजन डवरी यांना वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत? कार्यकारी अभियंता राजन डवरी यांचे गेल्या आठवडा भरातील मोबाइल डेटा तपासण्यात यावा.आणि अरुणा प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्या आत्महत्येला जबाबदार धरून कार्यकारी अभियंता राजन डवरी संबंधित अधिकारी आणि तथाकथित धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनोज पाटील सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांना भेटून लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, सेक्रेतरी अजय नागप, उपाध्यक्ष मनोहर तळेकर ,सूर्यकांत नागप, सखाराम मोरे, सुचिता चव्हाण,आरती कांबळे, यांनी केली आहे. दुदेँवी आत्महत्याग्रस्त शांताराम नागप यांचे प्रकरण दडपू पाहणार्‍यांना हे प्रकरण दडपता येणार नाही. काळीज पिळवटून टाकणारी आणि मन हेलावणारी ही अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक घटना आहे. आत्महत्याग्रस्त शांताराम नागप आत्महत्या प्रकरणी कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यासह संबंधितांवर कठोर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज पाटील सहाय्यक पोलिस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!