कणकवलीकोकणमहाराष्ट्र

विवाहितेचा अश्लील व्हीडिओ बनवून खंडणी उकळली

*🛑विवाहितेचा अश्लील व्हीडिओ बनवून खंडणी उकळली*

*🛑संशयित आरोपीस दिवा येथून अटक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३:-* तालुक्यातील एका गावातील विवाहिता आंघोळ करीत असताना गुपचूपपणे तिचा व्हीडिओ काढत तो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन • तिच्याकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये उकळल्याप्रकरणी विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल असलेला संशयित रवींद्र नामदेव राऊळ (३५) याला कणकवली पोलिसांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा येथून रविवारी पहाटे अटक केली. सोमवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही घटना २०२२ ते २७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती आपल्या घराजवळ असलेल्या ताडपत्रीच्या सहाय्याने बनविलेल्या बाथरुममध्ये आंघोळ करत असताना संशयित रवींद्र याने गुपचूप व्हीडिओ काढला. काही दिवसांनी त्याने तो व्हीडिओ विवाहितेला दाखविला. तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. या धमकीच्या आधारे गेल्या दोन वर्षात त्याने विवाहितेकडून २ लाख ७० हजार रुपये उकळले. दरम्यान, २७ ऑगस्टला संशयिताने विवाहितेला गाठत पैशांची मागणी केली. तिने नकार दिला असता संशयिताने तिच्याशी अश्लिल संभाषण करत पुन्हा एकदा तो व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
अखेरीस विवाहितेने ३०
ऑगस्टला कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक हाडळ यांनी ‘मोबाईल लोकेशन’ तपासले असता संशयित रवींद्र हा दिवा येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक ३१ ऑगस्टला दिव्याच्या दिशेने रवाना झाले. एक सप्टेंबरला पहाटे २.३० च्या सुमारास रवींद्र याला पोलिसांनी अटक केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!