झोपेची गोळी देत मंगळसूत्र लांबविले
*🛑झोपेची गोळी देत मंगळसूत्र लांबविले*
*🛑कोल्हापूर-सावंतवाडी प्रवासादरम्यान घटना*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३१:-* कोल्हापूर ते सावंतवाडी एसटी प्रवासात महिला प्रवाशाला झोपेची गोळी देऊन बेशुद्ध करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. सदरची महिला ओटवणे-सावंतवाडी येथील असून कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येत होती. शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवाशाने तिला उलटी, प्रतिबंधक गोळी खायला दिली. त्यानंतर काहीवेळाने बेशुद्ध झाली. बस सावंतवाडी स्थाकात आल्यानंतर सदर महिला बेशुद्धावस्थेत आढळली.कोल्हापूर येथून सायंकाळी सहा वाजता सुटणाऱ्या कोल्हापूर-सावंतवाडी बसमधून ओटवणे-सावंतवाडी येथील दीक्षा दशरथ शृंगारे (३७) प्रवास करत होत्या. त्यांच्या बाजूला एक अनोळखी व्यक्ती बसली होती. काही वेळानंतर त्या व्यक्तीने शृंगारे यांना ‘तुम्हाला उलटी होते का?’, असे विचारत तिला दोन गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यांना झोप लागली. बस सावंतवाडी बसस्थानकावर आली असता अन्य सर्व प्रवासी खाली उतरले. मात्र, शृंगारे बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर येताच त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना एसटी बसमध्ये एका अनोळखी व्यक्तीने गोळी दिली. ती खाल्ल्यानंतर झोपी गेल्याचे सांगितले. तर एसटीमध्ये उलटी होते म्हणून आपल्या घरातूनच एक गोळी खाऊन आली होती, असे तिने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एसटी बसमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासात महिलांना हेरून दागिने लंपास करणारी टोळी सध्या कार्यरत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गस्त वाढविण्याचे ठरविले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
