कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

न्हावेली उपसरपंच पदी अक्षय पार्सेकर, तर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गजानन दळवी यांची निवड

*🛑न्हावेली उपसरपंच पदी अक्षय पार्सेकर, तर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गजानन दळवी यांची निवड*

*🛑भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले अभिनंदन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* न्हावेली गावच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच श्री अक्षय पार्सेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री गजानन दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी न्हावेली ग्रामपंचायतीला भेट देत गावच्या विविध अडचणींबाबत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवर गावच्या पाठीशी ठामपणे राहण्याची आणि गावाच्या सहयोगातून परिवर्तन घडवून आणण्याची हमी श्री विशाल परब यांनी दिली.

यावेळी त्यांनी नवनिर्वाचित युवा उपसरपंच पदी निवड झालेल्या अक्षय पार्सेकर यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री पार्सेकर यांनी गावच्या विकास कामांबाबत विशाल परब यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री गजानन दळवी यांचाही श्री विशाल परब यांनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गावच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर स्वतः लक्ष देऊन मार्गी लावेन, असे अभिवचन यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी ग्रामस्थांना दिले. गावाला भेट देत आपुलकीने गावच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली यासाठी ग्रामस्थांनी श्री.विशाल परब यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कार्यक्रम प्रसंगी युवा समाजिक कार्यकर्ते समिर पार्सेकर, रुपेश नाईक, तुळशीदास पार्सेकर, बंड्या दळवी, राज धवन, गजानन दळवी संदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!