कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

अवैध गुरे वाहतूक करणारे दोघे ताब्यात

*🛑अवैध गुरे वाहतूक करणारे दोघे ताब्यात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग , दि-२९:-* घाटमाथ्यावर तळकट कुंभवडेमार्गे कत्तलीसाठी अवैधरित्या गुरे वाहतूक करणाऱ्या चंदगड येथील मयूर गुंडू नाईक (२४), अजय तुकाराम नाईक (२४) या दोघांना तळकट येथील युवकांनी थांबवून दोडमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोडामार्ग पोलिसांनी या दोघांवर कत्तलीसाठी गुरे नेत असल्याच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. तळकट-कुंभवडे मार्गे चारचाकी बोलेरो पीकअप गाडी घाटमाथ्यावर एकदिवस आड करू जात असल्याचे तळकट येथील युवकांच्या निदर्शनास आले. मंगळवारी रात्री तळकट येथील युवकांनी ती गाडी आली असता थांबवली व विचारपूस केली. त्यावेळी चालक मयूर नाईक व त्याचा साथीदार यांनी बनवाबनवा करत ती गुरे शेतीच्या कामासाठी किंवा पाळण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. प्रत्येकवेळी त्यांचे उत्तर वेगळे असल्याने त्या युवकांनी दोडामार्ग पोलिसांना फोन केला व घटनास्थळी बोलावले. त्यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी गांडीची झाडाझडती घेतली व त्यावेळी त्यांना गाडीत तीन गुरे असल्याचे निदर्शनास आले. सर्व विचारपूस केल्यानंतर त्या दोन्ही संशयितांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तळकट येथील सरपंच सुरेंद्र सावंत, प्रज्योत देसाई, प्रकाश देसाई, झोळंबे उपसरपंच गाडगीळ, अवधूत वेटे, चंद्रहास राऊळ, गौरेश गवस, अनंत गवस, रजत देसाई, बाबल गवस, ऋषी राऊळ, बंड्या राऊळ, नारायण राऊत, काका राणे, लवू वेटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!