कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

संदिप गावडे मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेत राजपूरचे गोविंदा पथक प्रथम

*🛑संदिप गावडे मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेत राजपूरचे गोविंदा पथक प्रथम*

*🛑भव्य दहीदंडीत चित्तथरारक सात थर लावत दिली सलामी**

*🛑ऑनलाइन शुभेच्छा देत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी साधला सावंतवाडीकारांशी संवाद*

*🛑स्पर्धेत एकूण आठ गोविंदा पथकांचा सहभाग*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* भाजप नेते संदीप गावडे आयोजित भारतीय जनता पार्टी सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४ स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर रात्री अधिकच वाढत गेली. महापुरुष गोविंदा पथक नीमजगा बांदा गोविंदा पथकाने थरारक सात थरांची सलामी दिल्यानंतर हनुमान प्रसन्न राजापूर संघाने त्यांच्याही पेक्षा कमी वेळेत सात थरांची सलामी देत हा संघ सुंदरवाडी दहीहंडी महोत्सवाच्या या स्पर्धेचा मानकरी ठरला. या संघाला संदीप गावडे यांच्या माध्यमातून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
तर महापुरुष गोविंदा पथक नीमजगा बांदा गोविंदा पथकासह या महोत्सवात थरावर थर रचत सलामी देणाऱ्या अमेय तेंडुलकर मित्र मंडळ सावंतवाडी, शिवगर्जना बांदा, माऊली गोविंदा पथक वाफोली, पाटपरुळे म्हापण, महापुरुष मित्र मंडळ भटवाडी सावंतवाडी, प्रभात मित्र मंडळ गोविंदा पथक मळावाडी साळगाव या संघांनाही रोख ११ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तर ‘मुलगी झाली हो’ व ‘धागा धागा जोडते नवा ‘फेम अभिमंत्री दिव्या फुगावकर व ‘माझ्या नवऱ्याची बायको ‘फेम अभिनेत्री रुचिरा जाधव यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात अनोखी रंगत आणली. त्यांच्या व्यासपीठावरील आगमनानंतर युवाईने एकच जल्लोष केला.
मुख्य कार्यक्रमात रंगत आणली ती विविध दहीहंडी मंडळांच्या उपस्थितीने. राजापूर येथील हनुमान प्रसन्न गोविंदा पथकासह सावंतवाडी तालुक्यातील एकूण आठ दहीहंडी मंडळांनी यावेळी उपस्थित राहत थरांवर थर रचत सलामी दिली. यावेळी उपस्थित दहिहंडी प्रेमींनी टाळ्यांच्या गजरात उपस्थित गोविंदांना प्रोत्साहीत केले.
या महोत्सवासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रमोद सावंत, माजी नगरसेवक मनोज नाईक, संदीप गावडे यांचे वडील एकनाथ गावडे, संदीप यांच्या मातोश्री सौ. सुनिता गावडे, वडिल एकनाथ गावडे, चंदन धुरी, जितेंद्र गांवकर, बंटी पुरोहित, गेळे सरपंच सागर ढोकरे, उमेश पेडणेकर, देवसू सरपंच रुपेश सावंत, म. ल. देसाई, दीनानाथ कशाळीकर, एकनाथ परब, अनिकेत आसोलकर, अशोक परब, माडखोल माजी सरपंच बाळू शिरसाट, भाऊ कोळंबेकर, प्रकाश दळवी आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर, शुभम धुरी व प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
*संदीप गावडे सावंतवाडीतील उभरते नेतृत्व* : प्रभाकर सावंत संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचा शतक प्रतिशतपणा ओथंबून भरलेला दिसतो. सावंतवाडी मतदारसंघातील विवीध कार्यक्रमांमधून याचीच प्रचिती येत असून संदीप गावडे हे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व म्हणून विकसित होत आहेत, अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संदीप गावडे यांना शुभेच्छा दिल्या. तर माजी आमदार राजन तेली यांनी संदीप गावडे उभरते नेतृत्व असून त्यांच्या कार्यक्रमांमधून भाजपला एक हक्काचे व्यासपीठ मिळत आहे, असे गौरवोद्गार काढले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!