महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा आजचा राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित!..
*🛑 महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा आजचा राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित!..*
*🛑 बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समितीची स्थापना*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-२८:-* महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ व पणन, वित्त सहकार, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, मा. पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रस्ताविक केले. कृती समिती चे समन्वय राजेंद्र बाठीया व दि पुना मर्चन्टस चेंबर चे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समिती च्या विविध प्रश्नाची मांडणी केली. फॅम चे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जीएसटी चे प्रश्न मांडले. मोहन गुरनानी, दिपेन अग्रवाल व भिमजी भानुशाली यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी एलबीटी कायदा २०१५ साली रद्द होऊनही अद्याप याबाबत नोटीस येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व राज्यातील सर्व महानगरपालिकामधील एलबीटी विभाग बंद करण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे केली. त्यास त्यांनी स्विकृती देऊन अधिकाऱ्यांना यासंबंधी आदेश काढण्याचे निर्देश दिले.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय व्यापार कल्याण बोर्ड च्या धर्तीवर महाराष्ट्रात स्टेट ट्रेडर्स वेलफेअर बोर्ड ची स्थापना करण्याची मागणी ललित गांधी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. बाजार समिती विषयासाठी तसेच जीएसटी व अन्य विषयांसाठी कृती समिती सदस्य व मुख्य सचिव व उच्च अधिकारी वर्गाची तीन समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने ३० दिवसामध्ये योग्य निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. दरम्यान या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले.उद्योग मंत्री उदय सामंत, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांची भूमिका सरकार कडे प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन बैठक आयोजनामध्ये सहभाग घेतला. याबाबत कृती समितीने चर्चा करून २७ तारखेचा एकदिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, फॅम चे सचिव प्रितेश शहा, ग्रोमा चे सचिव नितेश वीरा, पुना मर्चेंट चेंबर चे माजी अध्यक्ष प्रविण चोरबोले, अनिल भन्साली उपस्थित होते. ग्रोमाचे अध्यक्ष भीमजी भानुशाली यांनी आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

