आणखीकोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना, हिंदू म्हणून व छत्रपतींचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही

🛑 अधिकाऱ्यांवर खापर फोडून,हात झटकून, सत्ताधारी बाजूला होऊ शकत नाहीत

🛑 हा अपघात आहे, संयमाने घ्या ,असे सांगणारे सत्ताधारी ,विरोधी बाकावर असते तर हा संयम दाखवला असता का?

🛑 छत्रपतींचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या सर्वांसाठीच ही लाजिरवाणी बाब

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी, दि -२८:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली वाताहात ,विखुरलेले अवयव पाहून प्रत्येक हिंदूची मान शरमेने खाली गेली असेलच व हे विदारक चित्र पाहण्याचे धाडसही झाले नसले, तळपायाची आग मस्तकात जावी व प्रत्येक जण पेटून उठावा अशी ही घटना मात्र सारेच जण चिडीचूप..पुतळ्याचे राजकारण करू नये असे सत्ताधारी सांगतात हेच सत्ताधारी विरोधी बाकावर असते तर हातात टाळ घेऊन भजन केले असते का?हा आमचा सवाल आहे,खरे तर यांनी महाराष्ट्रात आगडोंब उसळला असता यांच्या प्रवक्त्यांनी सगळ्या सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले असते म्हणूनच आम्ही जबाबदारी ने सांगतो सत्ताधाऱ्यांना नैतीकतेची चाड असेल तर झालेल्या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन राजिनामा द्यायला हवा होता व तसा राजिनामा हे सत्ताधारी विरोधात असले असते तर अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून मागितला असता असे आमचे स्पष्ट मत आहे.

अवघ्या आठ महिन्यांत उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अनावरण झालेला कोणतेही वादळ, चक्रीवादळ सदृष्य परिस्थिती नसताना कोसळतो, त्या पुतळ्याचे भाग सगळीकडे विखुरले जातात व हे दृष्य समोर दिसते तेव्हा अंगावर काटा उभा राहतो, तळपायाची आग मस्तकात जाते,कोणी हा पुतळा घडवला?त्याचा अनुभव काय?त्यांनी आज पर्यंत असे किती पुतळे बनवले?त्याला हा ठेका कोणत्या आधारे दिला गेला?तो कोणाच्या मर्जितील होता?एकूण जेवढी रक्कम दाखविण्यात आलेली रक्कम तेवढी खरोखरच खर्च झाली काय?हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, फक्त पुतळा घडवणारा व अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे नाटक करुन काही उपयोग नाही या घटनेला सत्ताधारीही तेवढेच जबाबदार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला हा पुतळा पत्त्यांच्या बंगल्या सारखा कोसळतो व आपण हे सर्व पाहून शांत बसतो यासारखे दुसरे दुर्दैव नाही.एकतर मी असे पुतळे उभारण्याचे समर्थन करीत नाही व मी पुतळा उभारणे या गोष्टीच्या विरोधात आहे,कारण त्या पुतळ्यांची अशा प्रकारे विटंबना करुन त्या पुतळ्यांच्या नावाने कोट्यवधी रूपयांची मलीदा खाण्यापेक्षा महाराजांचे विचार आत्मसात करा असे पहिल्या पासून माझे स्पष्ट मत आहे.

आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या बद्दल जर‌ एखादी अप्रिय घटना घडली तर अखंड हिंदुस्थान पेटून उठायचा,ठिक ठिकाणी आंदोलने व्हायचीत अखंड हिंदुसमाज रस्त्यावर उतरायचा तोच माझा सकल हिंदू समाज शांत कसा हा मला पडलेला प्रश्न आहे,मला कोणाचीही माथी भडकावयची नाहीत की कोणावर मुद्दाम आगडोंब उसळवायचा नाही पण घडलेली घटना ही निश्चितच सत्ताधाऱ्यांना व सकल हिंदू समाजाला भूषणावह नाही,ज्यांनी छत्रपतींचे नाव घेऊन गेली अनेक वर्षे राज्य केले त्यांच्या साठी तर नाहीच नाही..

हा छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची कारणे प्रत्येक जण आपापल्या अक्कल हुशारीने देत आहे तर काहिजण म्हणतात खारे वारे , काहीजण सांगता आतील स्टील ला गंज पकडली..काय ही तकलादू कारणे अरे लाज वाटायला पाहिजे.. छत्रपतींनी उभारलेले अनेक किल्ले कित्तेक वर्ष उन पाऊस,वारा झेलतात ते आजही तसेच उभे आहेत,मालवणातील समुद्रात बांधलेला किल्ला हा त्याची साक्ष आहे,त्यांची साडेतीनशे वर्षे झाली तरीही एक विठ ढासळली नाही,आणि ज्या पुतळ्याला उभारून जेमतेम आठ महिने झाले तो पूर्णच्या पूर्ण कोसळतो यासारखे पुतळ्यातील भ्रष्टाचाराचे दुसरे उदाहरण नाही,माना शरमेने खाली जातात आम्ही छत्रपतींचे मावळे म्हणायला, आम्हाला आता लाज वाटू लागली कारण आम्ही त्या योग्यतेचे नाहीत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी वाईटातून चांगले घडायच असेल असे म्हटले या मागचा अर्थबोध मला झाला नाही ते म्हणतात तो एक अपघात होता कदाचित असेही असेल वाईटातून चांगल घडायच असेल म्हणजे जो महाराजांचा पुतळा उभारला होता तो व्यवस्थित न होता आता आम्ही पुन्हा भव्यदिव्य उभारु असे त्यांचे मत असेल मात्र आमच्या राजांच्या बाबतीत फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे म्हणून घाई गडबडीत उभारलेल्या पुतळ्याची जबाबदारी फक्त त्या कारागिराची आहे की त्याला घाई गडबडीत बनवायला लावलेल्या सत्ताधाऱ्यांची हे एकदा स्पष्ट व्हायला हवे..

पूर्वी अस उपरोधाने म्हटलं जायचं की वरून शंभर रुपये आले की ते खालच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचे पर्यत एक रुपया शिल्लक राहतो म्हणजे 99 रुपये व्यवस्थाच गिळंकृत करते.अशा पद्धतीचं काम करणाऱ्या त्या ठेकेदारापर्यंत नक्की किती रुपये पोहोचले की त्यातले 99 रुपये व्यवस्थेने गिळंकृत केले हा संशोधनाचा विषय आहे या व्यवस्थेत राज्य चालवणारे शासनकर्तेही येतात बरे का? त्यामुळेच तर त्याला निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरावे लागले तर नाही ना, याचाही शोध घ्यायला हवा.

शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण साठी झालेली घाईगडबड याचेच तर हे फलीत नसेल ना? म्हणतात ते काही खोटे नाही.. अति घाई संकटात नेई असं तर झालं नाही ना?आमचं सरकार असेल तेव्हा तुम्ही आम्हाला दोष द्यायचा आणि तुमचं सरकार असेल तेव्हा आम्ही तुम्हाला दोष देऊ, एवढ्याच राजकारणापुरतं या विषयाचा विचार न करता याच्या खोलात जाणे गरजेचे आहे,किमान आमच्या अस्मितेच्या प्रतीक असलेल्या शिवरायांच्या बाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून अभ्यास, तज्ञता, कौशल्य, निष्ठा, अस्मिता, प्रेम या गुणांनीच शिवरायांच्या बाबतीतील कोणतही काम करायला हवं असे आमचे स्पष्ट मत आहे.

शिवरायांच्या नावाचा उपयोग या ना त्या कारणांनी सगळेच पक्ष करतात, आम्ही सुद्धा बेंबीच्या देठापासून शिवाजी महाराज की जय.. अशा घोषणा देतो. त्यामुळे असं जेव्हा काही घडतं तेव्हा मराठी माणूस म्हणून आम्हा सर्वांनाच थोडी का होईना जनाची नाही तर मनाची लाज वाटलीच पाहिजे. त्या सगळ्याची जबाबदारी थोडी का होईना आमच्यावरही येऊन पडते. कारण शेवटी राजकारणी ,ठेकेदार, शिल्पकार, अधिकारी हे आमच्याच समाजाचे एक भाग आहेत

ज्यांच्या मुळे हिंदू धर्म शाबूत राहिला,ज्या मंदिरात भक्ती भावाने आम्ही डोकी टेकतो ती आमची मंदिरे माझ्या राजामुळे शाबूत राहिली त्या माझ्या राजच्या पुतळाच्या विटंबनेला जे जे जबाबदार असतील त्यांना हिंदू म्हणून घेण्याचा व छत्रपतींचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही एवढे ठाम पणे सांगतो..

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!