कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चा स्तुत्य उपक्रम

*🛑आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चा स्तुत्य उपक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* प्रशालेतील विद्यार्थ्याना उद्यानविद्या महाविद्याल मुळदे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने दिले कृषी विषयक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल हे अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्याची बौध्दीक स्थिती वाढविण्यासाठी इतरही उपक्रम राबवित असतात. प्रशालेतील विद्यार्थ्याना कृषी विषयक माहिती होण्यासाठी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व प्रशालेच्या वतीने एक कृषी विषयक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन चा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कलम बांधणी, झाडावर फवारणी करताना कोण कोणती काळजी घ्यावी,फुलांपासून सुगंधी अत्तर कस बनवायचं या विषयी तसेच कृषी विषयक माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनातील प्रश्न विचारले.त्याला उद्यान विद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग्य असे मार्गदर्शन केले. झाडावर कलम बांधणी, तसेच झाडावर फवारणी करताना कोण कोणती काळजी घ्यावी या बाबत नाट्यरुपात प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा कृषी विषयक मार्गदर्शन मिळाल्याने आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांची बौध्दीक स्थिती वाढविण्यासाठी प्रशालेत अभ्यासक्रमाबरोबर इतरही अनेक उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर मुळदे महाविद्यालयाचे विद्यार्थी ध्रुव मालडीकर, संचित तांबट, अल्पेश वाळके , शशांक साळुंखे, प्रदीप चौधरी , अभिषेक अनाप, अंकित गवाणकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिरीष नाईक, शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक,सौ.देवयानी चव्हाण ,मिताली नाईक , सौ. नेमळेकर,प्रशालेचे कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तानाजी वरक तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री शिरीष नाईक यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!