कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

छत्रपतींच्या पुतळा अपघाताचे कोणी राजकारण करू नये -मंत्री दिपक केसरकर 

 

छत्रपतींच्या पुतळा अपघाताचे कोणी राजकारण करू नये -मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी दि. २६-: छत्रपती शिवाजी महाराज कधी राजकारण पाहिले नाही त्यामुळे मालवण राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा अपघात प्रकरणी कोणीही राजकीय भांडवल करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले तर घडलेली ही अतिशय दुर्दैवी आहे सदर महाराजांच्या पुतळा पुनश्च महाराष्ट्र सरकार उभारून देईल आणि तो उभारताना संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा उभारला जाईल असेही मंत्री केसरकर म्हणाले. श्री केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले मालवण राजकोट येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे मात्र हा अपघात करत असताना त्यामध्ये काही शुभ संकेतही असावेत असे आपले भावाना आहे कारण कारण हा पुतळा किल्ल्याच्या तटापेक्षा जास्त उंचीचा असावा अशी सिंधुदुर्ग वासियांची मागणी होती. परंतु तो दीडशे फूट इतका उभारण्यात आला होता मात्र आता नव्याने उभारताना तो पुतळा दीडशे फूट इतका उंचीचा उभारावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न असणार आहे. आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानांना आपण या ठिकाणी आणू शकलो तर ती महाराजांसाठी एक प्रकारे आदरांजली असेल तसेच हा पुतळा महाराष्ट्राच्या लौकिकाला साजन असा उभारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!