कोकणमहाराष्ट्रमालवण

इंग्रजी शाळांची वेळ बदला !

*🛑इंग्रजी शाळांची वेळ बदला !*

*🛑रोझरी स्कूलच्या पालकांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२६:-* इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वेळ सकाळी ९ ते दुपारी २.४५ अशी बदलल्याने मुलांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर परिणाम होत आहे. मुलांबरोबरच पालकांचीही ओढाताण होत आहे. त्यामुळे शाळांची वेळ बदलून सकाळी ९ ते २ अशी करण्याची मागणी मालवण रोझरी इंग्लिश स्कूलच्या पालकांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक यांच्याकडे केली आहे. केसरकर इंग्रजी शाळेची वेळ बदलण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातून सकाळी ८ वाजता बाहेर पडणाऱ्या मुलांना शाळा सुटल्यावर घरी पोहोचण्यास सायंकाळी ४ ते ४.३० या वेळेत मुलांनी सकाळी डब्यातून आणलेले जेवण दुपारपर्यंत थंड होत असल्याने मुले नीट जेवत नाहीत. जेवणाची वेळ बदलल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही लांब राहणाऱ्या व नोकरदार पालकांची मुलांना ने-आण करताना धावपळ होत आहे. बदललेल्या वेळेमुळे मुलांना इतर स्पर्धा परीक्षांचे शिकवणी वर्ग, नृत्य, कराटे आदी क्लासला जाताना ओढाताण होत आहे. देवबाग, चौके, आचरा अशी लांबून मालवणात येणारी मुलेही आहेत. मालवण तालुका हा पर्यटन तालुका असल्याने पर्यटन हंगामात शाळेच्या बदललेल्या वेळेमुळे मुलांना घरी पोहोचण्यास आणखी वेळ लागणार आहे. या अडचणी लक्षात घेऊन शाळेची वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी १.३० किंवा ९ ते दुपारी २ अशी करावी, अशी मागणी पालकांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दरम्यान, इंग्रजी शाळांच्या बदललेल्या वेळेमुळे विद्यार्थी व पालकांना होणाऱ्या त्रासाबाबत ठाकरे शिवसेनेच्या मालवण-कुडाळ युवतीसेनाप्रमुख शिल्पा यतीन खोत यांनीही लक्ष वेधले आहे. पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विनवणी करूनही अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याप्रश्नी मार्ग काढावा, असे शिल्पा खोत यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!