यशवंत गड येथील समुद्रात बुडणाऱ्या सात पर्यटकांचा जीव वाचवणाऱ्या जीवरक्षक संजय गोसावी यांचा सन्मान..

▪️भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व १० हजार रुपयांचा धनादेश देऊन जीवरक्षक गोसावी यांचा गौरव..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴 वेंगुर्ले,दि.१४: तालुक्यातील रेडी येथील यशवंत गड समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेताना अचानक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या सात पर्यटकांचा बहुमूल्य जीव त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या जीवरक्षक संजय गोसावी यांनी वाचवला. त्यामध्ये भारतीय २ पर्यटक व विदेशी ५ पर्यटक त्यात १ लहान मुलगा, २ महिला व २ पुरुष यांचा समावेश आहे.

श्री.संजय गोसावी यांनी जीवरक्षक म्हणून हे धाडसी व उल्लेखनीय काम सन २०१९-२०, २०२०-२१ या वर्षात केलेलं आहे. त्यांच्या धाडसी कार्याबद्दल भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व १० हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या या धाडसी व प्रामाणिक कार्याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यावरणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली.

दरम्यान भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने जीवरक्षक श्री. संजय गोसावी यांचा सन्मान करताना संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सह सचिव राजेश सातोस्कर, खजिनदार सौरभ नागोळकर व कोकण विभाग सीईओ राजन रेडकर आदी उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!