वर्ल्ड रेकॉर्ड करणारे जय जवान पथक दहीहंडीत सहभागी होणार
*🛑वर्ल्ड रेकॉर्ड करणारे जय जवान पथक दहीहंडीत सहभागी होणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२६:-* भाजप प्रवक्ते, आमदार नीतेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित जय जवान गोविंदा पथक सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४०० गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे या दहीहंडी स्पर्धेत मानवी मनोरे रचण्याचा थरार यानिमित्ताने सिंधुदुर्गवासियांना अनुभवायला मिळणार आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ही दहीहंडी होणार आहे. त्यासाठी प्रथम पारितोषिक पाच लाख ५५ हजार ५५५ रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय चार ते आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महिला गोविंदा पथकही या उत्सवात सहभागी होणार आहे. उत्सवासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद यांच्यासह इतर अभिनेते आणि नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या मुंबई येथील जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ४३.१७ फूट उंचापर्यंत मानवी मनोरे रचून विश्वविक्रम केलेला आहे. अशा या गोविंदा पथकाच्या आगमनामुळे सिंधुदुर्गवासियांची उत्सुकता वाढली आहे. या पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानवी मनोरे म्हणजेच थरावर थर रचले जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

