कणकवलीत वर्दळीवेळी रस्ता दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी
*🛑कणकवलीत वर्दळीवेळी रस्ता दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४:-* शहरातील आचरा मार्गावर आप्पासाहेब पटवर्धन मुख्य चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे ऐन वर्दळीच्यावेळी शुक्रवारी दुपारनंतर बुजविण्याचे काम हाती घेतल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कोणतेही नियोजन न करता, या खड्डे बुजविण्याच्या कामाचा मनःस्ताप कणकवलीवासीयांसह वाहनधारकांना सहन करावा लागला. गेले चार दिवस पावसाची उघडीप असताना हे काम न करता, भर पावसात करण्यात आलेल्या या कामाच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. कणकवली शहरात आचरा मार्गावर मुख्य चौक ते लक्ष्मी चित्रमंदिरच्या दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. जुन्या पोस्ट कार्यालयादरम्यान तर खड्ड्यांचे प्रमाण मोठे होते. त्यात नगर पंचायतीतर्फे शुक्रवारी दुपारी २.३० नंतरच्या सुमारास हा रस्ता खड्डे बुजविण्यासाठी बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक गांगो मंदिरनजीच्या मसुरकर किनई या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. मुळात आचरा मार्गावर वाहतूक कोंडी ही नेहमीचीच ठरलेली असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी या मार्गावर वाहतूक कमी असताना खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्याची गरज असताना ऐन वर्दळीच्यावेळी हे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पर्यायी मसुरकर किनई मार्गावर दोन्ही बाजूला अनेक वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामुळे रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्याच्या आधी पर्यायी किनई मार्ग मोकळा करणे गरजेचे होते. या मसुरकर किनई मार्गावरून चिरे वाहतूक करणारी अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे अगोदरच पार्किंग, अवजड वाहतूक व त्यात वाढलेल्या ट्रॅफिकमुळे अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागला. कोणतेही नियोजन न करता, खड्डे बुजविण्याचे हाती घेतलेल्या कामांमुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. पाऊस नसतानाच्या कालावधीत हे काम न करता, पाऊस सुरू झाल्यावर काम करण्यामागचा उद्देश काय, असा सवालही उपस्थित केला जात होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
