इन्सुली येथील जखमी विजकंत्राटी कर्मचाऱ्याला मनसेतर्फे आर्थिक मदत
*🛑इन्सुली येथील जखमी विजकंत्राटी कर्मचाऱ्याला मनसेतर्फे आर्थिक मदत*
*🛑कंत्राटदाराने वाऱ्यावर सोडल्यामुळे आर्थिक हलाखीत सापडलेल्या कुडव कुटुंबाच्या पाठीशी मनसेचा हात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* ५ जून २०२४ रोजी निगुडे येथे वीज खांबावर चढून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह चालू झाल्याने गंभीर जखमी झालेल्या इन्सुली डोबवाडी येथील गुरुनाथ मंगेश कुडव यांना आज मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर व इतर सहकाऱ्यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. कुडव गेले दोन महिने हातावर उपचार घेत आहेत मात्र गंभीर जखमी होऊन देखील कंत्राटदाराने त्यांना केवळ दोन हजार रुपये व अधिकारी वर्गाने एक हजार रुपये एवढी तुटपुंजी मदत केली व या संपूर्ण कुटुंबाचा आधार असलेल्या कर्माचाऱ्याला वाऱ्यावर सोडून दिले. आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याना कोणीही वाली नसल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. कंत्राटदारावर कोणाचाही अंकुश नसल्याने हे घाट माथ्यावरचे कंत्राटदार कंत्राटी कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत त्यांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते एखादा अपघात घडल्यास तुटपुंजी रक्कम देवून जबाबदारी झटकली जाते. दरम्यान कुडव यांना कंत्राटदाराकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मनसेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी कुडव कुटुंबाला दिले. या वेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत,उपतालुका अध्यक्ष सुनील आसवेकर ,इन्सुली शाखा अध्यक्ष दिनेश मुळीक ,सतीश आकेरकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

