कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

जिल्हयात ३०६ जागांसाठी होमगार्ड भरती

*🛑जिल्हयात ३०६ जागांसाठी होमगार्ड भरती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२२:-* जिल्ह्यात होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झाली असून पोलीस दलाच्या दिमतीला तब्बल ३०६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी जिल्हयातील सुमारे १२०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये ३०१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. शासनाने होमगार्ड भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. यानुसार अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक कृषिकेश रावले यांच्या अधिपत्याखाली सिंधुदुर्ग जिल्हयातील ७०० मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील सुमारे १२०० उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. लेखी परीक्षा वगळता पोलीस भरतीप्रमाणेच या उमेदवारांची छाती, उंची, वजन इत्यादीची मोजणी केली जाते. तसेच पुरुषांसाठी १६०० मीटर धावणे, तर महिलांसाठी ८०० मीटर धावणे, गोळाफेक इत्यादी मैदानी
चाचणी घेतली जाते. १९ ते २१ ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. २२ रोजी पात्र उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या असून त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून लवकरच अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. एकूण पदांच्या ३३ टक्के पदांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. निवडणुका व सणवार इत्यादी कार्यक्रमाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड नियुक्त केले जातात. जिल्ह्यात सध्या सुमारे १२०० पोलीस कार्यरत असून नवीन होमगार्ड भरतीमुळे पोलीस दलाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. नियुक्तीनंतर या उमेदवारांना ३५ दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कवायत, शस्त्रास्त्र हाताळणी, टीम वर्क, लोकांशी वागण्या-बोलण्याचे कौशल्य इत्यादी बाबी शिकविल्या जाणार आहेत. शिवाय ऑफिसशी संबंधित कामांबाबत काहींना मुंबई येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. होमगार्ड म्हणून तीन वर्षे चांगली सेवा बजावणाऱ्या उमेदवाराला नियमित पोलीस भरतीत पाच टक्के
आरक्षणाची सोय आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!