आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 संदिप गावडे फाउंडेशन च्या वतीने यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा

🛑 फक्त टॅलेंट शोधणार नाही तर घडवणार हे ब्रीद वाक्य

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२१:- सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. आपल्या विद्यार्थ्यांचा शालांत परीक्षेचा निकाल हा 100% लागतो. मात्र असे असताना एमपीएससी आणि यूपीएससी , बँकिंग व तत्सम सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता समाधानकारक का दिसत नाही?, हा चिंताजनक विषय आहे. विद्यार्थ्यांनी बालवयातच स्पर्धा परीक्षांची कास धरावी, त्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची मानसिकता तयार व्हावी, या प्रांजळ उद्देशाने संदीप गावडे फाऊंडेशन या वर्षापासून इयत्ता चौथीसाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा’ परीक्षा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते संदीप गावडे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

युवा नेते संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीसाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा’ आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीसाठी ही स्पर्धा परीक्षा प्रथमतः सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी मर्यादित स्वरूपात घेण्यात येणार आहे. या तीनही तालुक्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, असेही संदीप गावडे यांनी सांगितले.

पुढील टप्प्यात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी ते इयत्ता बारावीपर्यंत ही स्पर्धा घेण्याचा मानस असून आगामी काळात संपूर्ण जिल्हाभर याची व्याप्ती वाढणार असल्याचेही श्री. गावडे यांनी नमूद केले.

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या फाऊंडेशनमार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. या परीक्षेचा उद्देश फक्त एका वर्षासाठी मर्यादित नसून गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी प्रोत्साहित केले जाणार आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे, असे फाऊंडेशनचे सचिव व प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत यांनी सांगितले.

यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, विद्यमान अध्यक्ष सुधीर गावडे, उपाध्यक्ष रोशन राऊत, सचिव दत्ताराम सावंत, कार्यकारिणी सदस्य सतीश राऊळ, प्रवीण शेर्लेकर, महेश सावंत, समीर जाधव, भास्कर गावडे, तेजस्विता वेंगुर्लेकर, राधिका परब, स्वाती पाटील, रुपेश परब, जे. डी. पाटील, सुरेंद्र विर्नोडकर, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!