धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजसेवा व्रत अलौकिक – प्रमोद कामत..
*🛑 धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजसेवा व्रत अलौकिक – प्रमोद कामत..*
*🛑 डोंगरपाल येथे तीनशे वृक्षांची लागवड..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२१:-* डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग, रायगड यांच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन यासाठी पद्मश्री , महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी श्री माऊली विद्या मंदिर डोंगरपाल,डिगणे, ता.सावंतवाडी यांच्या माध्यमिक प्रशालेच्या परिसरामध्ये तीनशे वृक्षांचे वृक्षारोपण 90 श्रीसदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
डोंगरपाल वृक्षारोपण प्रसंगी डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवंदडा यांचे समाजसेवेचे व्रत अलौकिक असून वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद भाई कामत यांनी केले. दरम्यान या उपक्रमाच्या वेळी गृप ग्रामपंचायत डिंगणे चे सरपंच संजय अर्जुन डिंगणेकर,शालेय संस्था खजिनदार-गुणाजी गोपाल गवस,शाळा मुख्याध्यापक – संतोष सीताराम वावळिये, शिक्षकेत्तर कर्मचारी बाला तानू गवस,घनश्याम भिसे गवस,उत्तम महादेव कदम,विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ व श्री बैठक बांदा,श्री बैठक तळवडे,श्री बैठक माणगाव येथील श्री सदस्य उपस्थित होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपुर्ण कार्य करीत आलेले असुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे. वृक्षांची संख्या कमी होत असल्याने मानवी जीवनावर दुष्परिणाम,ऋतुचकावर अनिष्ट परिणाम होऊन पाऊस नियमितपणे पडत नाही;काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी नदयांना अचानक महापुर तसेच औष्णिकस्तर वाढू लागल्याने वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन हे आपले उत्तरदायित्व आहे.यामुळे स्वयंस्फुर्तीने वृक्षलागवड करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातुन होत असुन समाजासमोर आदर्श उभा राहत आहे.वृक्षारोपण करून विश्वसेवा,राष्ट्रसेवा,मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातुन आंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्वाची आहे.वृक्षलागवडी बरोबरच त्यांचे संगोपन महत्वपुर्ण आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातुन जिल्ह्यात यापुर्वीच्या हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपुर्वक केले जात असुन या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग होत आहे. मोहगनी, जांभूळ,कांचन,अर्जुन,बेल,हरडा,आपटा,बहावा आदी विविधप्रकारची लागवड केलेल्या औषधी व जंगली झाडांचे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन संगोपन केले जाणार आहे. ह्या उपक्रमा अंतर्गत जिल्हाभर विविध ठिकाणी आपापल्या परिसरात श्रीसदस्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. अलीकडेच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांदा स्मशानभूमीमध्ये पाच वर्षांपूर्वी अडीचशे झाडांची लागवड करून व त्यांचे पाच वर्ष नियोजनपुर्वक संगोपन करून प्रतिष्ठान ने ती झाडे बांदा ग्रामपंचायत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.प्रतिष्ठानच्या अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

