Uncategorized

साटेली येथे आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन

*🛑साटेली येथे आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-२०:-* वृक्षतोड केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारणे हा शासनाचा निर्णय शेतकऱ्यांना अन्यायकारक असून याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी साटेली येथील गणेशोत्सव सभामंडपात मंगळवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वा. शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.
राज्य मंत्रिमंडळात नुकताच अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी विविध सोळा प्रजातीच्या वृक्षतोडीवर ५० हजार रुपये दंड आकारण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस येणार आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या नावावर तुटपुंजी जमीन 5 आहे. त्यात एकाच सातबारावर अनेक नावे असतात. त्यामुळे वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेताना अनेक अडचणी येतात. कोकणातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थकारण हे वनशेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. शेतकरी प्रामुख्याने साग, फणस, आंबा आदी झाडे मोठ्या प्रमाणात लागवड करून वाढवतात व पूर्ण वाढ झालेली झाडे गरजेनुसार विकून आपली उपजीविका भगवतात. मात्र, शासनाने ही झाडे प्रामुख्याने ५० हजार दंड करणाऱ्या झाडांच्या यादीत टाकल्याने शेतकरी अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी संघटित होऊन आवाज उठवत आहेत. यासाठी साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सभामंडपात मंगळवारी सायंकाळी चार वाजता शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या वेळी भाजप युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांसह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!