कोकणशासकीयसिंधुदुर्ग

दीड वर्ष रखडलेली जि. प. पेन्शन अदालत आज

*🛑दीड वर्ष रखडलेली जि. प. पेन्शन अदालत आज*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२०:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची रखडलेली पेन्शन अदालत दीड वर्षानंतर आता २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत, त्यांना वेळीच न्याय देता यावा यासाठी दर तीन महिन्यांनी पेन्शन अदालत आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जि. प. कडून या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप निवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर यांनी केला आहे. यापूर्वीची पेन्शन अदालत २० जानेवारी २०२३ रोजी झाली होती. त्या पेन्शन अदालतमध्ये मांडलेले अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. शिवाय मागील दीड वर्षात वित्त व शिक्षण विभागाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडश्रेणी फरकाची बिले, सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे झाली तरी न मिळालेली गटविमा रक्कम, काही सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांच्या नियमबाह्यरित्या वसूल केलेल्या रकमा, पेन्शन विलंबाने प्रदान करणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम रखडवून ठेवणे, वेंगुर्ला तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाच्या मृत्यूनंतर देय असलेली भविष्य निर्वाह निधी रक्कम त्या कर्मचाऱ्याच्या वारसास अद्याप देण्यात आलेली नाही. देवगड तालुक्यातील एका सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे जिल्हा कार्यालयाने मंजूर केलेल्या त्यांच्या पत्नीच्या आजारपणाचे वैद्यकीय बिल देवगड शिक्षण विभागाकडून गहाळ झाले आहे. अशा स्वरुपाचे अनेक प्रश्न असून ते या पेन्शन अदालतीत मांडले जाणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत अणावकर यांनी दिली. दरम्यान, ज्या सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांचे आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांनी आपली निवेदने घेऊन अदालतमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!