ग्रा. पं. संगणक परिचालकांचे मानधन तात्काळ द्या !
*🛑ग्रा. पं. संगणक परिचालकांचे मानधन तात्काळ द्या !*
*🛑परिचालकांचे सावंतवाडी ‘बीडिओं’ना निवेदन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं. आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी आपल्या दोन महिन्याच्या थकित मानधनाबाबत गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना सोमवारी निवेदन दिले. थकित मानधन तात्काळ मिळावे, अशी मागणी केली. नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ महिन्यांतील मानधन अद्यापही न मिळाल्यामुळे संगणक परिचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ दरम्यान, राज्य संगणक परिचालक संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले होते. परंतु, तालुक्यातील संगणक परिचालकांनी या आंदोलनात सहभागी न होता आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांनी ग्रा.पं.मध्ये नियमितपणे हजर राहून काम केले. तरीही या कालावधीचे मानधन अद्याप वितरित केलेले नाही. नोव्हेंबर २०२३ महिन्यातील फक्त १५ दिवसांचे मानधन देण्यात आले असून, उर्वरित १५ दिवसांचे मानधन थकित आहे. गणेशोत्सवात संगणक परिचालकांना थकित मानधन तातडीने दिले जावे, अशी मागणी केलीय. केंद्रचालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आर्थिक संकट वाढत चालले असून या समस्येचे त्वरित समाधान करणे आवश्यक आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे. निवेदनावर चेतना पालव, विद्या कळंगुटकर, समिक्षा भगत, योगिता सावंत, श्रावणी नाईक, चारुशिला गावडे, सोनाली गावडे, स्नेहल नाईक, अक्षता मुळीक, पौर्णिमा कदम, प्रेमा परब तेजल देसाई आदींच्या सह्या आहेत. वीज वितरण ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड यांनी परिचालकाच्या मागण्यांना पाठिबा दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

