बनावट संमतीपत्र तयार केल्याप्रकरणी चौघे निर्दोष
*🛑बनावट संमतीपत्र तयार केल्याप्रकरणी चौघे निर्दोष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१७:-* मुंबई येथील नोटरी पब्लिक यांच्यासमोर खोटे व बनावट हमीपत्र, संमतीपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी सुहास उर्फ श्रीकृष्ण हनुमंत नाईक मालवणकर यांच्यासह चौघांची मालवणचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी महेश देवकाते यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. प्राजक्ता गावकर आणि अॅड. उल्हास कुलकर्णी यांनी काम पाहिले. कणकवली येथील निवृत्त तहसीलदार भिकाजी हनुमंत नाईक-मालवणकर यांनी मालवण कुंभारमाठ येथील त्यांच्या जमिनीबाबत खटला दाखल केला होता. त्यानुसार, त्यांचे खोटे संमतीपत्र आणि हमीपत्र तयार केले, तसेच त्यांच्या कुंभारमाठ येथील जमिनीत असलेल्या विहिरीवरं पंपासाठी परस्पर फसवणूक करून वीज कनेक्शन घेतलेबाबत सुहास उर्फ हनुमंत श्रीकृष्ण नाईक-मालवणकर, हनुमंत सीताराम नाईक-मालवणकर, पृथ्वीराज सीताराम नाईक- मालवणकर, अनिल सीताराम नाईक-मालवणकर आणि सुनील सीताराम नाईक-मालवणकर यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर २०१० रोजी फिर्याद दिली होती. या पाचजणांवर मालवण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले होते. दरम्यान यातील एक आरोपी सुनील सीताराम नाईक-मालवणकर यांचे खटला सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. आरोपीचे वकील यांनी तपासातील अनेक त्रुटीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानुसार चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

