कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

कै.डॉ.संदीप कल्याणकर फौंडेशनच्या या समाजपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू.

*🛑कै.डॉ.संदीप कल्याणकर फौंडेशनच्या या समाजपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू.*

*🛑भूल तज्ञ डॉ.मृणाल तोरसेकर यांचे आश्वासन.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१६:-* कै.डॉ.संदीप कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून आपण जी रुग्णसेवा करत आहात ती खरोखरच समाजशील असून स्तुत्य आहे.समाजाला अशा रुग्णसेवेची गरज आहे. फौंडेशनच्या या समाजपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू असे आश्वासन मुंबई येथील भूल तज्ञ डॉ. मृणाल तोरसेकर यांनी येथे दिले.
डॉ.संदीप कल्याणकर फौंडेशन संचलित (कै.) डॉ.नंदू तोरसेकर रुग्णसेवा केंद्र नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ.तोरसेकर बोलत होत्या.बांदा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाडकर्णी कुटुंबियांनी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली. या जागेत फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना लागणारे वैद्यकीय साहित्य,व्हील चेअर, रुग्णांसाठी खाटा, वॉकर,यासंह अनेक वस्तू असून या रुग्णांना त्यांच्या मागणीनुसार पुरविण्यात येतात.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची तर फीत कापून रुग्णसेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.यावेळी सरपंच प्रियांका नाईक,वरूण तोरसेकर,मिलिंद कुलकर्णी,भाजपा सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर,बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर,डॉ. कल्याणकर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत डॉ. मिलिंद खानोलकर यांनी केले.यावेळी फौंडेशनच्या कार्यासाठी मृणाल तोरसेकर व रघुनंदन तोरसेकर कुटुंबीय यांच्याकडून ५० हजार रुपये,प्रमोद कामत,प्रसाद पावसकर व नंदू कल्याणकर यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक देणगी देण्यात आली.
प्रस्ताविकात खजिनदार मंगलदास साळगावकर यांनी फौंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.आतापर्यंत रुग्णांना दिलेले साहित्य, रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया तसेच फौंडेशनकडे उपलब्ध असलेले साहित्य याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी प्रियांका नाईक,श्वेता कोरगावकर या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार कल्याणकर यांनी केले.
यावेळी फौंडेशनचे सचिव मनोज कल्याणकर,डॉ.भालचंद्र कोकाटे,डॉ.संजय सावळ,डॉ.अनिश स्वार,दिवाकर नाटेकर,जगन्नाथ सातोसकर,सिद्धेश पावसकर,संजय शिरोडकर,निलेश मोरजकर,गुरु कल्याणकर,सुरेश गोवेकर,आशिष कल्याणकर,बाबी वसकर,नंदू कल्याणकर,अक्षय मयेकर,मंगल कामत आदी उपस्थित होते. यावेळी साहित्य मिळण्यासाठी मंगलदास साळगावकर किंवा मनोज कल्याणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आभार डॉ.मिलिंद खानोलकर यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!