आणखीमहाराष्ट्रसावंतवाडी

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना धडा शिकवा-रुपेश राऊळ..

*🛑 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना धडा शिकवा-रुपेश राऊळ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि-१६:-* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम करत असताना आगामी विधानसभा विजयाचा संकल्प करा असे आवाहन करत बेरोजगारी बरोबर आरोग्याचा गहन प्रश्न असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना धडा शिकवा असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी बोलताना दिला
त्यांच्या हस्ते कोलगाव येथून शिवसेनेच्या भगवा सप्ताह च प्रारंभ झाला यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी संघटिका सुकन्या नरसुले वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार प्रकाश गडेकर तालुका संघटक मायकल डिसोजा जिल्हा संघटक शब्बीर मणियार युवासेना तालुकाधिकारी कौस्तुभ गावडे अशोक परब सावंतवाडी तालुका महिला संघटक भारती कासार सुनील गावडे बाळू गवस नामदेव नाईक बाळू माळकर शैलेश टिळवे माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर सौ करमळकर विद्या राणे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना रुपेश राऊळ पुढे म्हणाले जनतेची सेवा आणि हृदयामध्ये स्थान मिळवण्याचे आणि मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याच्या शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून भगवा सप्ताह घेऊन सावंतवाडी तालुक्यामध्ये शिवसेना संपर्क यात्रा सुरू करत असून आगामी लोकसभेबरोबर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी लोकसेवक म्हणून काम करा असे आवाहन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले.यावेळी बोलताना सुकन्या नरसुले म्हणाल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत आता मिळणारे 3000 किंवा दीड हजार किती दिवस मिळतील असा सवाल करून घरेलू महिलांची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक हे सरकार महिलांची करत आहे मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे महिला बचत गटांची फसवणूक केली जात असून हक्काचा आमदार निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले यशवंत उर्फ बाळू परब यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी ही संपर्क यात्रा असून एकतेची मूठ बांधणीचा संकल्प करा आणि निवडणूक पीक पैशाची आमिषे जुगारून लावा असे आवाहन केले
तालुकाप्रमुख संजय गवस यांनी शिवसेना पक्ष सर्वसामान्यांचा कायम राहिला आहे त्यामुळे ही संपर्क यात्रा विजय यात्रा ठरावी यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गद्दारांना पाडण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले तर चंद्रकांत कासार यांनी पराभवाच्या भीतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची नामुष्की सरकारवर आल्याची टीका केली
सुरुवातीला प्रास्ताविक तालुका संघटक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसूज यांनी केले त्यानंतर शिवसैनिकांना काजू सुपारी आदी रोपांचे वाटप करण्यात आले त्यानंतर ही यात्रा कुंणकेरी आंबेगाव च्या दिशेने रवाना झाले भगवे झेंडे लावून गाड्या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद व शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देत ही यात्रा आजपासून सुरू झाली
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान आंबेगाव कारिवडे माडखोल सांगली सावरवाड कलंबिस्त त्यानंतर वेर्ले आणि शिरशिंगे अशी एका दिवसामध्ये ही यात्रा गेली दर दिवशी एका जिल्हा परिषद मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे तरी यात्रेत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!