कुडाळ सांगीर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला “परमार” प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका “संशयास्पद”..

▪️संगनमताने केलेल्या शासननिधी अपहार प्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय..?

▪️जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का; मनसेचा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१३: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ उपक्रमात कुडाळ सांगीर्डे येथील  इमारत क्रमांक ४०५६  भूसंपादन  मोबदला प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग व मांगीलाल परमार यांनी खोटा व बनावट प्रस्ताव बनवून संघटितपणे भ्रष्टाचार करत शासनाचे ४७ लाख ११ हजार रुपये  मोबदला रक्कम हडपल्या प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी सादर आहेत. मात्र, त्यावर अद्याप फौजदारी प्रकारची कारवाई होत नाही. हे पाहता महसूल प्रशासनच अशा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त हक्काच्या  मोबदल्यासाठी तीन वर्षाहून अधिक काळ शासनाकडे याचना करत आहेत, वारंवार आंदोलने करत आहेत, तर दुसरीकडे खोटे बनावट प्रस्ताव तात्काळ मंजूर होऊन  शासनाचे पैसे लाटले जातात. ही खरी शोकांतिका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधी याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. हे जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रत्यक्ष भूसंपदनात इमारत नसताना देखील बांधकाम व भूमी अभिलेख विभागाकडून खोटे अहवाल दिले गेले. हे उघडपणे सिद्ध झाले असून त्यावर कारवाई केली जात नाही. हे पारदर्शी कारभारास काळीमा फासणारे आहे. शिवाय महसूलचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी मुक गिळून गप्प बसतात. या पाठीमागे नेमके कोणते हात व कोणाचे हितसंबंध दडलेले आहेत. याचा विचार आता जनतेनेच करायची वेळ आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात आता जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाईचे आदेश निर्गमित करावेत अन्यथा जिल्हा प्रशासन भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर नसून व भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी  घालत असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाण्याची भीती आहे. यामुळे भविष्यात भ्रष्टाचार वाढीस लागून अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होतील. अशी भीती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!