कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण
*🛑कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण*
*🛑कोकण रेल्वेच्या प्रवाशी समस्या प्रश्नाबाबत लवकरच रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५:-* सिधुदुर्गनगरी -कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशन वरील समस्या आणि सुविधा जलद गाड्यांना थांबे पुरेसा तिकीट कोठाआणि परप्रांतीयांच्या लोंढ्यात कोकणी माणूस चिरडला जात आहे यावर लक्ष देण्यासाठी आयोजित उपोषणालाराज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन रेल्वेच्या प्रश्नाबाबत योग्य ती दखल घेऊ रेल्वे मंत्र्यांशी ही बोलू तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी लवकरच रेल्वेच्या प्रश्नाबाबत क्षेत्रीय प्रबंधक मार्फत समस्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवू तर कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे यांनी अखेरआपल्या अखत्यारीतील समस्या आठ दिवसात सोडवू व रेल्वे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे विविध समस्यांचा प्रस्ताव सादर करू असे आश्वासन दिल्यामुळे आजचे उपोषण संपविताना अध्यक्ष प्रकाश पावस्कर यांनी या प्रश्नी लक्ष न दिल्यास आम्हाला पुन्हा धरणे आंदोलन किंवा रेल रोको सारखा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा ही दिला आहे सिधुदुर्गगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर कोकण रेल्वे अधिकारी आणि बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे सांडपाणी , विद्युतीकरण ,अंतर्गत प्लॅटफॉर्म यांसह अनेक सुविधा पासून ही सर्वचस्टेशन वंचित आहेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत समावेश करा यावर लक्ष वेधणे साठी १५ ऑगष्ट स्वातंत्रदिनीरोजी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या माध्यमातून लक्षवेधी लाक्षणिक उपोषण केले, यावेळी कोकणरेल्वे संघर्ष व समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर सिधुदुर्ग स्टेशनचे अध्यक्ष शुभम परब जिल्हा समन्वयक नंदन वेगुर्लेकर रानबांबुळी सरपंच परशुराम परब , गावराई सरपंच सोनल शिरोडकर , सुकळवाड सरपंच युवराज गरुड , कसाल सरपंच राजन परब ,दादा गावडे , सहसचिव . अजय मयेकर खजिनदार साई आंबेरकर रमेश जामसांडेकर सुहास परब , सुनिल पाताडे , प्रणिल कावले , आबाजी राणे , राजू परुळेकर ,माजी सभापतीअजिक्य पाताडे , प्रसाद मोरजकर ,सागर कुशे , अशोक परब या सह मोठ्याप्रमाणात रेल्वे प्रवाशी व्यापारी यांनी उपस्थित राहून पाठीबा दिला उपोषणा उत्फुर्द प्रतिसाद मिळाला यावेळी रेल्वे क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक आंबोडकर यांनी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून लेखी पत्र देऊन उपोषण संपविण्याचे आवाहन केले आपल्या अखत्यारीतील प्रश्न क्षेत्रीय प्रबंधक रत्नागिरी निर्णय घेतील व उर्वरित मागण्यांबाबत रेल्वे चेअरमन डायरेक्टर यांच्या स्तरापर्यंत प्रस्ताव पाठविला जाईल असे सांगितले .
यावेळी दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत. त्यापैकी अनुक्रमे कणकवली, वैभववाडी, कुडाळआणि सावंतवाडी या चारही तालुक्यातून कोकण रेल्वेचा अधिकृत रेल्वे मार्ग असून अनुक्रमे खारेपाटण, वैभववाडी रोड, आचिर्णे, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ झाराप सावंतवाडी आणि मडुरा अशी दहा रेल्वे स्टेशन आहेत. वरील दहा स्टेशन पैकी केवळ कणकवली, कुडाळ, सावंतवाडी याच रेल्वे स्टेशन वर बहुतांश गाड्यांना थांबा मिळत असून उर्वरित सात स्टेशनवर किरकोळ थांबे वगळता गेली अनेक वर्षे सातत्याने अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व स्टेशन वर मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असून तुलनात्मक दृष्ट्या जवळच्या रत्नागिरी जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यामध्ये असलेल्या रेल्वे स्टेशन वर चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा स्थानिक लोकांच्या तसेच राजकीय दबावामुळे निर्माण करून दिलेल्या आहेत. सदरील भेदभाव आमच्या जिल्ह्यातील नागरिकावर केला जातोय याचे उत्तर गेल्या २५ वर्षात आम्हाला मिळालेले नाही. येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या काळात लाखो मुंबईकर चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून तिकीट उपलब्ध होत नसल्यामुळे संडासच्या बाजूला बसून व दरवाज्यावर लटकत राहून अतिशय वाईट पद्धतीने स्थानिक प्रवाश्यांना प्रवास करावा लागतो. हा त्रास गेली अनेक वर्षे जिल्हावासीय सहन करत असून येणाऱ्या काळात हा मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रास कमी करण्यासाठी सी.एस.टी.एम. ते सावंतवाडी व दादर ते मडूरा अशा स्वतंत्र दोन गाड्या दररोज कायमस्वरूपी चालू कराव्यात जेणे करुन जिल्ह्यातील प्रवाशांना त्रास होणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १० ही रेल्वे स्टेशन वरील अडीअडचणीवर लक्ष वेधण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी सर्व रेल्वे प्रवाशी संघटना नी एकत्रित १५ ऑगस्ट २४ रोजी लक्षवेधी लाक्षणिक उपोषण केले.दरम्यानकोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती व क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग नगरी येथील विश्रामगृहात आयोजित उपोषण बाबत समन्वय बैठक पार पडली होती यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र कांबळे वाहतूक प्रबंधक शैलेश आंबर्डेकरजिल्हा समन्वयक नंदनवेंगुर्लेकर सिंधुदुर्ग स्टेशनप्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब सहसचिव अजय मयेकर राजन परब ,संजय वालावलकर आदींसहसर्वच स्टेशनचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते याबाबत झालेल्या चर्चेत क्षेत्रीय प्रबंधक कांबळे यांनी कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी २७८ गाड्या सोडण्यात आले आहेत रेल्वेच्या प्रत्येक स्थानकाच्या समस्या व प्रश्न याबाबत शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या माध्यमातून सर्वकर्षक करारकरण्यात आला आहे त्या दृष्टीने खारेपाटण ते मडुरे पर्यंत स्टेशनचे रस्ते आणि सुविधा हाती घेण्यात येणार आहेत , यावर रेल्वे प्रशासन रेल्वे मार्गातील बाथरूम टॉयलेट सह शेड उभारणी बाबत काम करण्यास देत नाही त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास होतो काही स्टेशनवर तर सरपटणाऱ्या जनावरांचाही उपद्रव वाढला आहे अशा अनेक समस्या मांडल्या रेल्वे प्रशासनाने याबाबत रेल्वे बोर्डाकडे सिंधुदुर्गातून जाणाऱ्या गाड्यांना जलद थांबा पीआर ओ सिस्टीम प्रत्येक स्टेशनवर कोटा , सावंतवाडीतील टर्मिनल ,सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे टेशन असून या स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा अशा महत्त्वाच्या प्रश्नाबाबत रेल्वे बोर्डाची बैठक बोलावून त्यामध्ये जिल्हा समन्वय समितीला निमंत्रित करावे व तसा प्रस्ताव आपण क्षेत्रीय प्रबंधक म्हणून पाठवून त्याची प्रत आम्हाला द्यावी जेणेकरून खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रेल्वेच्या प्रमुख अधिकारी रेल्वे मंत्र्यांशी बोलणे शक्य होईल गेल्या पंचवीस वर्षात रेल्वे प्रवाशांबाबतअनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले असते तर आज खाजगी प्रवासी बस वाहतुकीकडे लोटला नसता रेल्वे मध्ये वाढती गर्दी अनेक प्रवाशांना जीवघेणी ठरत आहे याबाबत दिलेल्या पत्राची दखल घ्यावी अपंगांच्या दृष्टीने प्रत्येक रेल्वेमध्ये अपंग डबा व पोलीस असावा अपंगांच्या सुविधा आणि सवलती मिळाव्यात अशा अनेक मुद्द्यावर चर्चा झाली परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व स्टेशनच्या अध्यक्षांनी याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्हाला यापुढे योग्य तो उपोषण व अन्य मार्ग पत्करावा लागला परंतु यावर क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे यांनी माझ्या अख्यारीत येणाऱ्या शौचालय सुविधा लाईट रस्ता स्टेट लाईट रस्त्यांची झाडी या सुविधा बाबत आठ ते दहा दिवसात तात्काळ सुधारणा करण्यात येईल तसेच रेल्वे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या अखत्यारित नवीन गाड्या थांबे प्लॅटफॉर्म निवारा शेड वर ओव्हर ब्रिज वाय-फाय सुविधा सुलभ शौचालय पी आर एस सिस्टिम सुविधा गरजांबाबत प्रस्ताव पाठविला जाईल असे लेखी आश्वासनन दिल्यामुळेआज चे उपोषण संपविलेयावर अध्यक्षअध्यक्ष प्रकाश पावसकर यांनीयाबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यासआम्हाला पुन्हा जन आंदोलन किंवा रेल रोको सारखा मार्ग पत्करावा लागेलअसा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

