रामदास पालशेतकर यांना राष्ट्रपती पदक
*🛑रामदास पालशेतकर यांना राष्ट्रपती पदक*
*🛑सिंधुदुर्गातील २२ पोलिसांना पदोन्नती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५:-* सिंधुदुर्ग पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ घोषित करण्यात आले आहे. तर पोलीस दलातील एकूण २२ पोलिसांना पदोन्नती देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी पदोन्नतीचे आदेश काढत पोलिसांना स्वातंत्र्य दिनाची भेट दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा-२०१३ मधील उत्तीर्ण झालेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिल्याने या कार्यालयाच्या
आस्थापनेवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त झाली होती. ही रिक्त पदे विचारात घेऊन ७८ व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. तर सात पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर १५ ऑगस्टपासून बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला निर्गमित करण्यात आले आहेत. पदोन्नत झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

