आणखीकोकण

चौकुळ गावचा सातबारा कबुलायतदार गावकर अशी नोंद करून सामायिक सातबारा म्हणून दिला जाईल; मंत्री दिपक केसरकर

चौकुळ गावचा सातबारा कबुलायतदार गावकर अशी नोंद करून सामायिक सातबारा म्हणून दिला जाईल त्या सातबारावर जेवढी कुटुंब आहेत त्या सर्वांची नावे असतील अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित खात्याचे सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित असल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते म्हणून त्यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तोडगा काढण्यासाठी गाव समितीच्या सदस्यांना घेऊन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित खात्याचे सचिव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत कबुलायतदार गावकर समिती नेमून त्या समितीच्या नावे सातबारा करून त्या सातबारात गावातील सर्व कुटुंबाची नोंद केली जाईल या कबुलायतदार गावकर समितीमध्ये जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व गावातील प्रमुख सदस्य यांचा समावेश असेल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. उद्या चौकुळ येथे जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना या निर्णयाची प्रत देऊन त्यांचे उपोषण सोडू असे यावेळी बोलताना केसरकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर आंबोली गेळे येथील प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!