कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान सबलिकरण योजनेपासून डावलण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न होत असल्याने आंबोलीतील अरुण चव्हाण यांचे १५ ऑगस्ट रोजी उपोषण..

*🛑 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान सबलिकरण योजनेपासून डावलण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न होत असल्याने आंबोलीतील अरुण चव्हाण यांचे १५ ऑगस्ट रोजी उपोषण..*

*🛑दाखल केलेला प्रस्ताव गायब,तक्रार केल्यानंतर प्रस्ताव हजर..अजब कारभार*

*🛑आंधळ दळतय कुत्र पीठ खातय असा विभागाचा कारभार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-१४:-* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान सबलिकरण योजनेपासून डावलण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग यांचेकडुन होत असल्याने वारंवार दाद मागूनही प्रशासन जागे होत नसल्याने आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण उद्या पंधरा ऑगस्ट रोजी तहसिलदार कार्यालया समोर आपल्या मागण्यांसाठी उपोषण छेडणार आहेत. अरुण चव्हाण,हे मौजे आंबोली ता. सावंतवाडी येथील भूमीहीन अनुसुचीत जातीतील आर्थिक दुर्बल घटकांतील व्यक्ती असून दादासाहेब गायकवाड व सबळीकरण व स्वाभीमान योजनेसाठी अर्ज क्र. ५९ हा सन २०१९ मध्ये दाखल केलेला होता. सहाय्यक आयुक्त सिंधुदुर्ग यांचे कडून १३/०३/२०२० ची पात्र लाभार्थी यादी निवड परस्पर व प्रसिद्ध करण्यात आली. सदरची यादी हो निकषांप्रमाणे बनविणेत आली नाही. माहिती अधिकारात घेतलेल्या माहीतीनुसार निकष डावलून लाभार्थी यादी बनविण्यात आली. व लाभार्थी यादीतून आटल्याला परस्पर डावलण्यात आल्यामूळे या विरोधात प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी उपोषण छेडावे लागले. मात्र अशी कोणतीच यादी बनविण्यात आली नाही. असे लेखी पत्र आयुक्तांकडून देण्यात आले. सन २०१९ रोजी आपल्या प्रस्तावा संबंधीत आपल्याला संशय आल्यामुळे आपण दि. १६/०३/२०२४ रोजी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण ओरोस यांच्याकडे माहिती अधिकारात माहिती मागविली २०१९-२० मधील यादीमध्ये आपल्या नावाचा उल्लेख आढळून येत आहे. परंतु आपण सादर केलेला प्रस्ताव तत्कालीन कालावधी मधील असलेने दप्तरी आढळुन येत नाही. असे बेजबादारपण लेखी उत्तर माहिती अधिकारात देण्यात आले प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली असता, हा एकमेव प्रस्ताव गायब असल्याचे समजले.
माहिती अधिकारात २०१९-२०२४ पर्यंत पात्र व अपात्र लाभार्थी यादी मागविण्यात आली. मात्र सदरची यादी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र व आपात्र अशी कोणतीच यादी जाहिर केली नसल्याचे दि. ०१/०४/२०२४ च्या माहिती अधिकारात कळविले आहे. परंतु दि.१०/०२/२०२० रोजी पात्र २२ लाभार्थ्यांची यादी सावंतवाडी तालुक्यात प्रसिद्ध केलेली आहे. सदरची यादी आज आपल्या जवळ आहे. दरम्यानच्या काळात आपण सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना जोपर्यंत आपला प्रस्ताव आढळून येत नाही तोपर्यंत योजनेचा लाभा दिल्यास आपल्यावर अन्याय होईल असा हरकत अर्ज दिलेला होता. व दि. १४/०५/२०२४ रोजी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या नक्कला माहिती अधिकारात मागितल्या होत्या त्या देण्यात आल्या व सोबत ०६/०६/२०२४ रोजीच्या पत्रांन्वये कार्यालयीन कामकाज व कार्यरत नवीन कर्मचारी यांना प्रस्ताव वेळेत न सापडल्याने व तो शोधण्यासाठी काही कालावधी लागला. आपण सादर केलेला २०१९ मधील अर्ज आढळून आला त्याच बरोबर आपल्या प्रस्तावाची छाननी केली असता आपला प्रस्ताव सदर योजनेसाठी परिपुर्ण नाही तसेच यावर्षी योजना अंमलबजावणी करत असताना नव्याने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. तरी आपण योजनेच्या अनुषंघाने योजनेतील अटी व शर्ती नुसार परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास दाखल करावा. आपला या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावाचा चालु आर्थीक वर्षामध्ये विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे माहिती अधिकारात कळविले होते. सन २०१९ ते आजतागायत या विभागाकडे अनेकांचे प्रस्ताव पडून आहेत मात्र आपल्याला त्रुटींची पुर्तता करण्यासाठी सांगण्याऐवजी नविन प्रस्ताव दाखल करण्यास सांगून आपल्यावर अन्याय करत असल्याचे लक्षात येते त्यामुळे आपल्याला आर्थीक व मानसिक त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे. व आपले कधीही न भरून निघणारे नुकसान करत आहे ती शासनाची योजना आहे या योजनेपासून लोकांना वंचित ठेवणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.सदरील योजनेचा संपुर्ण रेकॉर्ड मधील एकमेव प्रस्ताव केव्हा पासुन गायब होता तसेच माहिती अधिकारात गायब झालेला प्रस्ताव पुन्हा सापडणे ही अत्यंत गंभिर बाब असून या संपुर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. आपली दिशाभूल करून आपल्याला योजनेपासून वंचित ठेवणेचा केलेला हा प्रयत्न आहे असे लक्षात येते. प्रस्तूत प्रकरणी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध दाद मागणेसाठी व संपुर्ण प्रकरणाची चौकशी होऊन न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय हे घरापासून दुर असल्याने सावंतवाडी येथील तहसिलदार साहेब यांच्या कार्यालयासमोर १५ ऑगस्ट २०२४ रोजी कुटुंबासह अरुण चव्हाण उपोषणास बसणार आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!