कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कोकण रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आज सिंधुदुर्गात

*🛑कोकण रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आज सिंधुदुर्गात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१४:-* कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा देताच कोकण रेल्वे प्रशासनाला जाग आली. असून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी १४ ऑगस्टला संघर्ष समितीच्या भेटीला येत असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या भेटीत रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर चर्चा होणार सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी २.३० वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली
आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, आचिर्णे, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरे या स्थानकांतील समस्या आहेत. त्यामध्ये या स्थानकात काही एक्सप्रेस गाड्यांना थांबे नाहीत, अशा गाड्यांना थांबे मिळावेत, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि जिल्ह्यातील प्रस्तावित कसाल रेल्वेस्थानकाचे बांधकाम अजून ही झाले नाही. यासाठी कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकांवर या समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आली होती. समितीच्या माध्यमातून १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा ही इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर समितीचे समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी ही कोकण रेल्वे कार्पोरेशन कार्यालय, बेलापूर येथे भेट देऊन कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांची दुरवस्थेची संबंधित यंत्रणेला निवेदनाद्वारे कल्पना दिली होती. सतत केलेल्या पत्र व्यवहारामुळे आणि कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समिती-सिंधुदुर्गच्या माध्यमातून पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर १४ ऑ गस्ट रोजी दुपारी २.३० वा. कोकण रेल्वे कार्पोरेशन क्षेत्रिय प्रबंधक कार्यालय, रत्नागिरी या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती क्षेत्रिय प्रबंधक रवींद्र कांबळी यांनी दिली आहे. तक्रारी असतील तर शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समिती, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश पावसकर आणि समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!