कसाल येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची सहल आंबोली येथे हिरण्यकेशी मंदिरात देवदर्शनासाठी दाखल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१२: कुडाळ तालुक्यातील कसाल ग्रामपंचायत मध्ये पहिलीच विरंगुळा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हा कुडाळ येथे असून १०वर्षापूर्वी कसाल गावामध्ये या संघाची स्थापना केली आहे.
जेष्ठ नागरिकांकरीता, करमणूक म्हणून तबला पेटी वाजवणे अभंग गायन करणे., पुस्तके, पेपर वाचन, तसेच गावांमध्ये असणारे धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन मदत करणे, तसेच पाणी अडवणे पाणी जिरवा या वेळी बंधारे बांधण्यास मदत करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, याकरिता सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान असते.
प्रतिवर्षी दिवाळी सणाच्या सुट्टीमध्ये ज्येष्ठ नागरिक केंद्राची सहल जात असते मात्र यावर्षी करोनाचे सावट आल्याने दोन महिने या सहलीचे आयोजन पुढे ढकलण्यात आले होते.
सर्व कोरोणा विषयी प्रशासकीय नियमांचे पालन करून या वर्षी आंबोली येथे सहलीचे आयोजन केले.
यात आंबोली येथील हिरण्यकेशी देवस्थान, महादेव गड ,सावळे सादपॉईंट ,तसेच कुडाळ येथील टेंबे महाराज स्वामी दत्त मंदिर ,आदी ठिकाणी २० जेष्ठ नागरिकांची टीम धार्मिक स्थळांना भेटी देऊन सहल परत घरी सुखरूप परतली.
आज पर्यंत जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील विविध देवस्थाने व धार्मिक पर्यटन स्थळांना ,या विरंगुळा केंद्राच्या ज्येष्ठ नागरिकांनी भेटी दिल्या आहेत. गावातील एखाद्या गरीब कुटुंबाला औषधोपचार पुरवठा करण्याकरिता आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. यातूनच त्यांना एकजूठीचे समाधान मिळत आहे. कसाल ग्रामपंचायतचे मोठे येथे सहकार्य असून एक ऑफिसही या विरंगुळा केंद्रासाठी देण्यात आले आहे .या सहलीचे आयोजन यशवंत पवार ,हरिभाऊ गावडे ,पांडुरंग सावंत, संभाजी वेर्लेकर, तसेच श्री व सौ श्रीधर मेस्त्री ,आदींसह २९ जेष्ठ नागरीक सहलीस गेले होते.
सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत या विरंगुळा केंद्राची कार्यालय चालू असते. दररोज सकाळी ग्रामपंचायत येथे या केंद्राचे सर्व सभासद उपस्थित राहून विविध उपक्रम राबविण्यास गावाला सहकार्य करत आहेत.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_