आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 रामपूरमधील १५ ऑगस्टचा रास्ता रोको आ.भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१२:- गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार, शिवसेना नेते श्री. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने चिपळूण तालुक्यातील रामपूर-पाथर्डी-मिरवणे-गुढे-डुगवे हा रस्ता मार्च २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. परंतु, रस्त्याच्या दुरूस्ती व डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी सातत्याने करूनदेखील आताच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी या भागातील जनता रामपूर-गुढे फाटा येथे एकत्र येवून रास्ता रोको करणार आहेत. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्वतः आमदार श्री. भास्करराव जाधव हे करणार आहेत.

चिपळूण तालुक्यातील रामपूर, पाथर्डी, मिरवणे, गुढे, डुगवे या गावांना जोडणारा हा रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता. परंतु, जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता आणि खर्च करण्यास असलेली मर्यादा यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी आमदार श्री. जाधव यांनी प्रयत्न केले. सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून हा रस्त्याला दर्जोन्नती मिळवून देण्यास त्यांना यश आले. वास्तविक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर शासनाने त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. त्याचीही मागणी गेले दोन वर्ष ते मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे करीत आहेत. त्याअनुशंगाने या कामाची बजेट प्लेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आली. असे असतानाही शासनाने अत्यंत सूडबुध्दीने या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे टाळले.मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद झाली नाही म्हणून आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी स्थानिक विकास निधीतून ३० लाख रूपये उपलब्ध करून दिले होते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी पुन्हा त्यांनी केली होती. परंतु, याही वर्षी ती डावलण्यात आली. यावर्षीच्या पावसात रस्ता अधिकच खराब झाला. वाहतूक बंद होईल, अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये तीव्र असंतोषाची आणि संतापाची भावना आहे. त्यातूनच १५ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे कळताच आमदार श्री. जाधव यांनी स्वतः या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता रामपूर-गुढे फाटा येथे हा रास्ता रोको होणार आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!