पाडलोस गाव व्हॉट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा निकाल जाहीर.
*🛑पाडलोस गाव व्हॉट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा निकाल जाहीर.*
*🛑श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी)यांनी पटकाविला प्रथम क्रमांकाचा बहुमान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१२:-* पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी (बुवा- रुपेश येमकर) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोटगे (बुवा : हर्षद ढवळ) यांना द्वितीय तर श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ जाणवली (बुवा : योगेश मेस्त्री) यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपच्या भजन स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला भजन रसिकांसह महनीय मान्यवरांची उपस्थिती होती.
पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिरात पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन मानकरी आनंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर परब,पोलीस पाटील रश्मी माधव, माजी ग्रामपंचायत सदस्य रुचिता करमळकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना करमळकर,गोपाळ करमळकर,पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपचे अध्यक्ष राजाराम (पपी) गावडे,तसेच अशोक गावडे,चंदू गावडे, दत्ताराम गावडे,अंकुश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
भजन स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी (बुवा : अमित तांबोळकर),द्वितीय श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली (बुवा : सत्यनारायण कळंगुटकर),उत्कृष्ट गायक रूपेश येमकर (श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी),उत्कृष्ट हार्मोनियमवादक सावळाराम मणेरीकर (स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी), उत्कृष्ट पखवाजवादक संदीप पेडणेकर (रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोटगे), उत्कृष्ट तबलावादक शुभम गावडे (श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी), उत्कृष्ट झांजवादक गौरेश नाईक (श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रसादिक भजन मंडळ जाणवली),उत्कृष्ट गजर हर्षद ढवळ (रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोटगे),उत्कृष्ट कोरस श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी,उत्कृष्ट राग सादरीकरण सत्यनारायण कळंगुटकर (श्री देवी माऊली भजन मंडळ,साटेली) यांना प्राप्त झाले.सर्व स्पर्धकांचे पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.स्पर्धेत एकूण जिल्हाभरातून निवडक आठ मंडळांची निवड करण्यात आली होती. जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून गुरुदास गावकर (संगीत अलंकार गायन) व प्रशांत सरनोबत (संगीत अलंकार पखवाज) यांनी काम पाहिले केले.संपूर्ण स्पर्धेचे सूत्रंचालन राजा सामंत यांनी केले. व्हाट्सअप ग्रुपचे अध्यक्ष राजाराम गावडे यांनी ग्रुपच्या कार्यासंदर्भात माहिती दिली.सचिव प्रणित गावडे यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले.तर खजिनदार अमेय गावडे यांनी सर्व भजन मंडळ तसेच उपस्थित मान्यवर, रसिकांचे आभार मानले.
पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप तर्फे विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवले जातात. रक्तदान शिबिर, सांस्कृतिक,क्रीडा, शैक्षणिक,सामाजिक कार्यक्रमात पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपचा सहभाग असतो.केवळ गुड मॉर्निंग,गुड नाईट एवढ्यावरच न थांबता प्रत्येक गावातील व्हाट्सअप ग्रुपने असे उपक्रम राबवल्यास एक नवीन आदर्श निर्माण होईल.गावाला उत्सवाचे स्वरूप येईल,अशी प्रतिक्रिया मानकरी आनंद गावडे यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_