विवाहितेशी गैरवर्तनप्रकरणी सत्र न्यायालयाकडून जामीन
विवाहितेशी गैरवर्तनप्रकरणी सत्र न्यायालयाकडून जामीन
कणकवली
डॉक्टरकडे जाऊन घरी परतत असताना एको विवाहितेशी दुचाकीस्वाराने चालत्या गाडीवरून गैरवर्तन केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या नामदेव दिनेश घाडीगावकर (रा. हरकुळ बुद्रुक) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्याचा सशर्थ जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. आपल्या नातेवाईकांजवळ आलेली ही महिला डॉक्टरकडे जाऊन रात्रीच्यावेळी घरी परतत असताना आरोपीने तिच्यावर लक्ष ठेवून अंधाराचा फायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केले. आरोपीने त्यावेळी रेनकोट, हेल्मेट घातलेले होते. मात्र, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने याबाबत पाठपुरावा करून त्या वाहनाचा शोध घेतला असता, जिल्हयात विशिष्ठ कंपनीची चारच वाहने विक्री झाल्याचे उघड झाले. त्यापैकी एक वाहन हरकुळ बुद्रुक येथील नामदेव घाडीगावकर याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास केला असता, आरोपीने गुन्हा केल्याचे उघड झाल्याने त्त्याला अटक करण्यात आली होती.