महाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

पालकमंत्री म्हणून दौऱ्यावर आल्यास निकृष्ट कामे दिसतील!..

*🛑 पालकमंत्री म्हणून दौऱ्यावर आल्यास निकृष्ट कामे दिसतील!..*

*🛑 परशुराम उपरकर यांचा रवींद्र चव्हाण यांना टोला..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर पालकमंत्री म्हणून येत नाहीत. त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि – पालकमंत्री म्हणून यावे. तरच त्यांच्या विभागातील निकृष्ट दर्जाची कामे दिसतील, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. यावेळी आशिष सुभेदार, संतोष सावंत उपस्थित होते. उपरकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री, खासदार, आमदार जनतेला दिसू लागले आहेत. घोषणाही त्याच आहेत. पनवेलवरून ठेकेदार आणून केलेली रेल्वेस्टेशन सुशोभिकरणाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. कार्यकारी अभियंता सर्व निविदा काढतात. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही. सावंतवाडी रोड रेल्वेस्थानकावर सुशोभिकरण करण्यात आले आहे. मात्र, प्रवासी भिजत रेल्वेमध्ये चढ उतार करतात. पालकमंत्र्यांनी जरा याची पाहणी करून घ्यावी. प्रवाशांना सेवासुविधा टाळत नको तेथे खर्च केला जात आहे. ११ रेल्वेस्थानकांवर सुशोभिकरण करण्यात आले. एकाच कार्यकारी अभियंत्यांनी याचे टेंडर काढले. हे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या आशीर्वादा शिवाय शक्य नाही. सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असते तर जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकार, नागरिकांसमोर झापावे लागले नसते. जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत, हे हास्यास्पद आहे. जिल्ह्यातील रस्ते, विश्रामगृह बांधकामांची पाहणी करून पावले उचलावीत. गोव्यातील रस्त्यांवर खड्डे दिसत नाहीत. मात्र, सिंधुदुर्गात खड्डेच खड्डे पडलेत. बांधकाममंत्री म्हणून चव्हाण यांनी रस्ते बांधणीबाबत पावले उचलली पाहिजेत. गोव्यातील रस्त्याप्रमाणे येथील रस्त्यांचे डिझाईन केले पाहिजे, असेही उपरकरंनी सांगितले. सावंतवाडी शहरातील पर्णकुटी विश्रामगृह हेरिटेज दर्जाचे आहे. पण कोट्यवधी रुपये खर्च करूनही काय अवस्था झाली आहे, हे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी पाहिले पाहिजे. पालकमंत्र्यांच्या केसरीच्या घरी जाणारे रस्ते खराब झाले. पण नेमळे येथील महामार्गावर सासुरवाडीला जाणारा पूल पालकमंत्र्यांनी जलदगतीने केले, अशी टीकाही उपरकर यांनी केली. मंत्री दीपक केसरकर यांची पोकळ घोषणाबाजी
सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!