दरोडेखोरांच्या हाती नकली दागिने
*🛑दरोडेखोरांच्या हाती नकली दागिने*
*🛑सावंतवाडी पोलिसाच्या तपासात उघड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०६:-* सावंतवाडी-आंबोली येथे पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या पुणे येथील एका सराफी पेढीवरील दरोड्यातील संशयितांकडून हस्तगत केलेले – दागिने सोन्याचा मुलामा दिलेले बेन्टेक्सचे असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तशी फिर्यादही पुणे पोलिसांकडे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजस्थानच्या संशयितांनी टाकलेल्या दरोड्यात त्यांच्या हाती सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने आले. मात्र, या गुन्हयात त्यांना पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली. मात्र, दरोड्यातील संशयित अल्ताफ बाबू खान याच्याविरोधात राजस्थानमध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस अधिकारी निसर्ग ओतारी यांनी दिली. आंबोली येथे पोलिसांनी सापळा रचून आंबोलीच्या दिशेने अल्टो कारने येणाऱ्या दरोडेखोरांना शनिवारी जेरबंद केले होते. त्याच्या कारची झडाझडती घेतली असता दोघांजवळ रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसे तसेच दागिने सापडले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधील अल्ताफ बाबू खान, गोविंद भवरलाल दीनवाणी व राजुराम कृष्णराम बिष्णोई यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची- पोलीस कोठडी सुनावली. या गुन्हयाच्या तपासात संशयितांकडे सापडलेले दागिने सोन्याचा मुलामा दिलेले असल्याचे उघड झाले आहे. तशी फिर्यादही पुणे पोलिसांत दाखल आहे. तर त्यांच्याकडे सापडलेल्या रिव्हॉल्व्हर देशी आहेत. दरोड्याच्या गुन्हयात वापरण्यात आलेली कार संशयित अल्ताफ खान याच्या मालकीची आहे. संशयित पुण्यात दरोडा घालून गोवा येथे आले होते. गोवा येथून परतताना आंबोली पोलिसांनी आंबोली-पूर्वीचा वस देवस्थानजवळ सापळा रचून त्यांना जेरबंद केले. संशयित कोठडीत असून कोठडीची मुदत मंगळवार ६ ऑगस्टला संपत असल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_