कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

दुर्मिळ बनत चाललेल्या खवले मांजराला जीवदान

*🛑दुर्मिळ बनत चाललेल्या खवले मांजराला जीवदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०१:-* कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या ताब्यात देत जीवदान दिले. वन विभागाने या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी ताब्यात घेतले. कांदळगाव ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल वन विभागाने आभार मानले आहेत. कांदळगाव येथे खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याची माहिती स्वप्नील गोसावी यांनी वन परिमंडळ मालवणचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. हे खवले मांजर कांदळगाव ग्रामस्थ संतोष पारकर गुरे चारण्यासाठी गेले असता, त्यांच्या नजरेस पडलें. त्यांनी याबाबत पार्थ डिचवलकर यांना सांगून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरुप सुटका करून मालवण, वनपाल श्रीकृष्ण परीट यांच्या ताब्यात दिले. खवले मांजर जैवविविधतेतील
महत्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम १९७२ मधील शेड्युल एकमध्ये असून त्याला डिवचणे, पकडणे, त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. हे बचाव कार्य उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट, अनिल परब, ग्रामस्थ संतोष पारकर, पार्थ डिचवलकर, नारायण मेस्त्री, लवेश आयकर तसेच यूथ बिट्स फॉर क्लायमेटचे सदस्य स्वप्नील गोसावी, दर्शन वेंगुर्लेकर आदींनी सहभाग घेतला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!