कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

रेशन ग्राहकांना ऑफलाईन धान्य द्या !

*🛑रेशन ग्राहकांना ऑफलाईन धान्य द्या !*

*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२९:-* रेशन दुकानांवर धान्यासाठी थम लावून ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, सर्वसामान्य ग्राहक जेव्हा रेशन दुकानांवर धान्य घेण्यासाठी जातो, तेव्हा ‘सव्र्व्हर डाऊन’चे कारण सांगून ग्राहकाला माघारी पाठविण्यात येते. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी सर्व ग्राहकांना ऑफलाईन धान्य देण्याच्या सूचना रेशन दुकानदारांना द्याव्यात. अन्यथा युवासेनेतर्फे घेराव घालण्यात येईल, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.नाईक यांनी म्हटले आहे, सर्वसामान्य जनता आज जेव्हा रेशन दुकानावर धान्यासाठी जाते, तेव्हा त्यांना थम लावून ऑनलाईन प्रक्रियेने धान्य दिले जाते, पण आता रेशन दुकानावर गेल्यावर सर्व्हर डाऊनच्या अडथळ्यामुळे नागरिकांना माघारी पाठवून देतात. जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. एका व्यक्तीला ४ ते ५ वेळा थम लावण्यासाठी जावे लागत आहे. तरीही त्याला रेशन मिळत नाही. नागरिकांना येण्या-जाण्याचा नाहक भुर्दंड पडत आहे. युवासेनेकडे मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी जनतेतून येत आहेत. यावर उपाययोजना म्हणून ऑनलाईनऐवजी ऑफलाईन प्रक्रिया करावी.याबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी लक्ष घालून तहसीलदारांना सूचना द्याव्यात. ऑफलाईन धान्य वितरित करून नागरिकांच्या सह्या घ्याव्यात. सर्व्हरच्या समस्येवर ऑफलाईन धान्य देऊन सुरळीत धान्य पुरवठा करावा. आता महिनाअखेर असल्या नागरिकांना याची मुदतवाढही द्यावी, असेही नाईक यांनी म्हटले आहे. नागरिकांना होणारा त्रास युवासेना सहन करणार नाही. जनतेला ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण न झाल्यास युवासेना कार्यालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!