कोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्र

सासोलीत काळोखाचा फायदा घेत दुकान फोडले

*🛑सासोलीत काळोखाचा फायदा घेत दुकान फोडले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि- २५:-* विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत एका भुरट्या चोराने सासोली येथील दुकान फोडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. चोरट्याने दुकानातील पंधरा हजार रुपयांची रोकड लांबविला चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मनासोली येथील एक दुकानदाराने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारीच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. दुकानदार नेहमी सायंकाळी पाच ते ५:३० वा.च्या सुमारास दुकान बंद करून घरी जातात. मात्र, मंगळेवारी काही कामानिमित्त सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून निघून गेले. रात्री ९ वा. च्या सुमारास एक चोर त्याच्या दुकानात शिरला. हा प्रकार मालकास सीसीटीव्ही कॅमेरामुळे मोबाईलवर दिसल्याने त्याने तात्काळ दुकानात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. दुकानातील १५ हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केल्याचे मालकाच्या लक्षात आले. चोरटा आसपासचा असेल म्हणून मालकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडून आला नाही. दरम्यान सीसीटीव्ही पुन्हा तपासली असता चोरटा प्रथम आले. वा.च्या सुमारास दुकानात घुसल्याचे दिसून आले. यावेळी लगत असलेल्या एका दुकानात वाहून आल्याने चोराने तेथून धूम ठोकली. मात्र, काही वेळाने तो पुन्हा दुकानात शिरल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. बुधवारी सकाळी देखिल मालकाने त्याचा शोध घेतला. अखेर तो न मिळाल्याने दोडामार्ग पोलीस ठाणे गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या चोरट्याला पकडण्याचे आव्हान दोडामार्ग पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दोडामार्ग तालुक्यात सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. रात्रीच्यावेळी तालुक्यातील सर्वच गावे अंधारात असतात आणि याचाच फायदा भुरटे चोर घेऊ लागले आहेत. साटेली-भेडशी बाजारपेठेत देखील वीज नसल्याचा फायदा घेत सोमवारी रात्री तीन टपऱ्या भुरट्या चोरांनी फोडल्या. दुसऱ्याच रात्री म्हणजेच मंगळवारी सासोली येथे दुकान फोडले. तालुक्यात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी अलर्ट मोडवर राहणे अत्यावश्यक बनले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!