आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्र

सलग तिसऱ्या दिवशी गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद

सलग तिसऱ्या दिवशी गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद

वैभववाडी

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू
असलेल्या संततधार पावसामुळे गगनबावडा- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खोकुर्ले, मांडुकली, किरवे दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही या महामार्गावरची वाहतूक ठप्प होती. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंभी नदीला आलेल्या पुरामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खोकुर्ले, मांडुकली दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे रविवारी सायंकाळपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. या मार्गावरील वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. तर कोकणातून जाणारी वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून राधानगरीमार्गे वळवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!