कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना सहकार्य करावे!

*🛑 जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना सहकार्य करावे!*

*🛑 90 दिवस काम केल्याच्या दाखल्यास राज्यस्तरीय ग्रामसेवक युनियनकडून नकाराच्या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी संघटनेकडून पत्रक काढून करण्यात आले आवाहन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१९:-* ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास राज्य ग्रामसेवक युनियनने बांधकाम कामगार मंडळास पत्राद्वारे नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेस स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्याचे आवाहन विनंती पत्राद्वारे करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचेकडील सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांना दि.09-07-2024 रोजीच्या सादर पत्रान्वये 90 दिवसांचा दाखला देण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील काही ग्रामसेवक संघटनेच्या निर्णयाचा आधार घेऊन बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी दाखला देण्यास विरोध करताना दिसत आहेत.
बांधकाम कामगारांची होणारी गैरसोय व नुकसान पाहता स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना दाखला देऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी स्थानिक प्राधिकरणाकडून 90 दिवस काम केलेबाबतचा दाखला देण्याचे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन परिपत्रक दि. 22-09-2017 व 16-11-2015 नुसार नियमाधीन असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीकडील ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आतापर्यत बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी आवश्यक दाखला देवून सहकार्य केल्याचे उल्लेखित केले आहे. मात्र दि.10 जुलै 2024 पासून काही ग्रामसेवक राज्यस्तरीय संघटनेने विरोध केल्याचे सांगत दाखला देण्यास नकार देत असल्याने कामगारांना योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.वास्तविक संघटनेने दाखला देत असताना शासनाकडून सूचक नियमावली नसल्याचे कारण देत दाखला देण्यास नकार दिलेला असला तरीही ग्रामविकास विभागाकडील शासन परिपत्रकांमध्ये दाखला देण्याची कार्यवाही करताना कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तरीही सुद्धा संघटनेच्या भूमिकेचा आदर ठेवून बांधकाम कामगारांना मंडळाकडून वरिष्ठ पातळीवर पुढील कार्यवाही होईस तोवर बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीनुसार दाखला देण्याची विनंती वजा आवाहन श्री गावडे यांनी पत्रातून केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या असून शासनाकडून कष्टकरी कामगार वर्गासाठी पुढील महिना-दीड महिना चांगल्या सुविधा व कल्याणकारी योजनेंची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केली जाणार आहे. असे असताना आपल्या राज्यस्तरीय संघटनेकडून दिलेल्या उच्चस्तरीय पत्रावर उचित कार्यवाही होवून पुढील निकष अमलांत येई
पर्यंत स्थानिक पातळीवर दाखला देवून कष्टकरी कामगारांना सहकार्य करावे अशी भूमिका स्वाभिमानी संघटनेने ग्रामसेवक संघटनेपुढे ठेवली आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक व विकासात्मक बाबींची निर्मिती करणारे बांधकाम कामगार हे दोन्ही ग्रामविकासाचे अविभाज्य घटक असल्याने बांधकाम कामगारांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी ग्रामसेवक संघटना नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!