प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेकरिता 15 ऑगस्ट रोजी उपोषण
*🛑प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेकरिता 15 ऑगस्ट रोजी उपोषण*
*🛑सतत पाठपुरावा करूनही कार्यारंभ आदेश होत नसल्याने उपोषणाचा निर्णय – गुरु कल्याणकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१६:-* बांदा शहरातील मंजूर विकास कामांचा दोन वर्षे उलटूनही अंदाजपत्रक,कार्यारंभ आदेश न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,सावंतवाडी यांना १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणास बसण्याची पूर्वसूचना दिली.यावेळी बोलताना कल्याणकर यांनी सांगितले की,आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.रवींद्रजी चव्हाण व आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर करून आणतो.परंतु सदर कामांचे अंदाजपत्रक,टेंडर प्रक्रिया तसेच कार्यारंभ आदेश वेळेत न झाल्याने सदर कामे गेली दोन वर्षे प्रलंबित आहेत. याकरिता संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करूनही अंदाजपत्रक न होणे, ईतर तांत्रिक बाबी अशा सबबी सांगून केवळ आश्वासने देण्यात येत होती.आम्ही प्रयत्न करून विकासकामे मंजूर करून आणतो व तो विकासनिधी वापर न होता परत गेल्याने आमच्या शहराला त्याचे नुकसान सोसावे लागते. सदर विकासकामे वेळेत न झाल्याने या पावसात शहरातील दोन ठिकाणी पाणी साठुन स्थानिक नागरिक व व्यापारी यांचे नुकसान झाले.त्यामुळे सर्व सोपस्कार तातडीने पूर्ण करून या विकास कामांना कार्यारंभ आदेश मिळावा,याकरिता १५ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयाखाली उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने पुन्हा आचारसंहिता लागू झाल्यास सदर १ कोटी 80 लाखांची विकासकामे ही पुन्हा प्रलंबित राहतील.तसे होऊ नये व विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यावेळी गुरु कल्याणकर यांच्यासोबत हेमंत दाभोलकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

