🛑 तुळस येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
🛑 २२८ लोकांनी घेतला लाभ
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-१५:- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कुंभारटेंब युवक कला-क्रीडा मंडळ तुळस आणि विश्र्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा सुमारे २२८ लोकांनी लाभ घेत समाधान व्यक्त केले.
या शिबिराचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तुळस सरपंच रश्मी परब, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, विश्व हिंदू परिषद चे डॉ.राजन शिरसाट आणि नंदू आरोलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद तांडेल, ग्राम पंचायत सदस्य जयवंत तुळसकर व नारायण कोचरेकर, नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात मुंबई येथील प्रतिथयश डॉक्टर्स डॉ दिलीप पवार, डॉ रोहन कुलूर, डॉ शामला कुलूर,डॉ.किशोर धोंड, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ गणेश मुंडे, डॉ शाम राणे, डॉ. समृध्दी राणे, आयुर्वेदाचार्य डॉ माधुरी शिरसाठ यांनी सेवा दिली. सर्व डॉक्टर्स यांचा भेटवस्तू आणि शाल,रोप देऊन विशाल परब यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सदर शिबिरात स्त्री रोग,गर्भाचे आजार, हृदय विकार, नाक, कान, घसा, हात- पाय-सांधेदुखी,हाडाचे व दातांचे आजार, कॅन्सर, मेंदू विकार आणि आयुर्वेद अशा बाबीवर रोग निदान करून सर्वांना मोफत औषधे देण्यात आली.
उद्घाटक विशाल परब यांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर हा देवमाणूस असून आज तुळस येथे जे शिबिर आयोजित करून रुग्णांना जी सेवा दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून पुढील काळात या सावंतवाडी मतदार संघात महाआरोग्य शिबीर आयोजित केले जाईल, तसेच या मतदार संघात सहा रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
त्यांनी सातत्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे विशेष कौतुक करीत अशी मंडळ म्हणजे समजाचा आरसा आहे असे प्रतिपादन केले.
सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.सदर शिबिरात ॲड दत्ता पाटील हॉमियोपॅथी मेडिकल कॉलज वेंगुर्ला चे विद्यार्थी यांनी स्वयंमसेवक म्हणून सेवा दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार विजय रेडकर यांनी मानले.
सदर शिबिराला पेंडुर सरपंच संतोष गावडे, रवी शिरसाट, सुहास गवडळकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, परबवाडा उपसरपंच पपू परब, विश्व हिंदू परिषद चे सावंत आणि आपा धोंड, प्रणव वांयगणकर आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

