न्हावेली रेवटेवाडी भागात गेले १५ ते २० दिवस विजेचा लपंडाव सुरूच.
न्हावेली रेवटेवाडी भागात गेले १५ ते २० दिवस विजेचा लपंडाव सुरूच.
पाच दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी वीज कार्यालयासमोर उपोषण छेडणार.
रावजी पार्सेकर यांचा इशारा.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
न्हावेली रेवटेवाडी भागात गेले 15 ते 20 दिवस विजेचा प्रवाह कमीजास्त होत असल्याने विद्युत उपकरणांना धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण विभागाचे वारंवार याकडे लक्ष वेधून सुद्धा दुर्लक्ष होत असून नुकसान होण्याची भीती आहे.येत्या पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास दि.15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी वीज कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थ रावजी पार्सेकर यांनी दिला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून न्हावेली रेवटेवाडी भागात विजेचा लपंडाव व अन्य अनेक समस्या सुरू आहेत.विद्युत वाहिन्यांना लागणारी झाडी सुद्धा सफाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे सद्यस्थितीत वीजपुरवठा कमीअधिक होतो.याचा फटका विद्युत उपकरणांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांदा सहाय्यक कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांचे याकडे लक्ष वेधले तरी देखील निर्धोक उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे जर येत्या पाच दिवसांत रेवटेवाडी मधील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी वीज कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा ग्रामस्थ तथा वीज ग्राहक रावजी पार्सेकर यांनी दिला आहे.

