आणखीकोकणसावंतवाडी

शहर हद्दीतील तलाठीकार्यालयातील कागदपत्रे सावंतवाडीतच मिळतील यासाठी उपाययोजना करा 

शहर हद्दीतील तलाठीकार्यालयातील कागदपत्रे सावंतवाडीतच मिळतील यासाठी उपाययोजना करा

 

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी

 

सावंतवाडी शहरामध्ये चराठे गाव लगत असलेने सर्व कागदपत्रे आणणेसाठी तलाठी चराठे येथे जावे लागत आहे. सावंतवाडी शहर हदीमध्ये काही भाग चराठे म्युनिसिपल हद असे असल्याने शहराचा काही भाग हा तलाठी कार्यालय चराठे येथे असल्यामुळे बऱ्याच लोकांना तलाठीसाठी चराठे येथे हेलपाटे मारावे लागतात. बऱ्याच वेळा तलाठी महाशय भेटत नाहीत. त्यामुळे लोकांची परवड होते. जेष्ठ नागरीक, वयस्कर व महिला यांना शक्य होत नाही. तरी सावंतवाडी शहर हद्दीतील तलाठीकडील सर्व कागदपत्रे सावंतवाडी शहरातच मिळावे. यासाठी सावंतवाडी तलाठी कार्यालयातच उपलब्ध करुन शहरवासियांना त्यांचे कागदपत्रे व इतर दाखले मिळण्यासाठी सोयीस्कर होईल. जेणेकरून तहसिलदार येथे इतर दाखले घेणे सुलभ होईल आणी नागरीकांची चराठे वारी थांबण्यास मदत होईल अशा मागणीचे निवेदन सावंतवाडी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!